वेळीच योग्य निर्णय घेतला असता तर बरे झाले असते, अशा उपरतीचा प्रसंग अगदी प्रत्येकाच्या जीवनांत येतोच. यापकी काही निर्णय तुमच्या आíथक जीवनाशी निगडित असतील. कष्टाने कमावलेले पसे केवळ आपल्या मित्रमंडळींनी, कुटुंबीयांनी वा एजंटने सुचविले म्हणून कोणत्याही कंपनीच्या वित्तीय उत्पादनात, पॉलिसीत वा बँकेत गुंतविणे आणि हे पर्याय कशा प्रकारे काम करतात ते समजून न घेणे सर्रास घडताना दिसते. विशेषत: विमा हे संरक्षण वजा दीर्घकालीन बचतीचे साधन आहे. हा साधारण १० वष्रे वा त्याहून अधिक वर्षांसाठीचा दीर्घकालीन करार असल्याने, योजनेच्या कालावधीत या करारामध्ये बदल वा सुधारणा करणे कठीण असते. त्यामुळे, नंतर पश्चात्ताप करावा लागू नये म्हणून या उत्पादनांची आवश्यक ती माहिती घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा. आयुर्वमिा योजनेतील गुंतागुंतीच्या सर्व गोष्टी समजतीलच असे नाही कदाचित. परंतु, योजनेची निवड करताना पुढील घटक विचारात घ्यावेत:
गरजेवर आधारित गुंतवणूक
सर्वसाधारण नियम असा आहे की, तुम्ही घेतलेले जीवनकवच तुमच्या वार्षकि उत्पन्नापेक्षा १० पट असावे. जेणेकरून दुर्दैवाने तुम्हाला काही झाल्यास तुमच्या कुटुंबावर आíथक दुष्परिणाम होऊ नये. आपले आíथक नियोजन नेहमी संतुलित आणि गरजेवर आधारित असावा. उदा., मुलांच्या शिक्षणासाठी निधी तयार करायचा असेल तर विमा कंपन्या देत असलेल्या विविध योजनांपकी साजेशा योजनेची निवड करावी. या योजनेमुळे तुम्ही असाल किंवा नसाल तरी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही नियोजित केलेला निधी मुलांना उपलब्ध होईल, याची काळजी घेतली जाईल. मुलांचे शिक्षण किंवा निवृत्ती अशा तुमच्या गरजा ओळखायला हव्यात आणि त्यानुसार योजना खरेदी करावी, जी तुम्हाला भविष्यात तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
पाश्र्वभूमी तपासून योग्य काळजी घेणे
योजनेविषयी निर्णय घेतला की, संबंधित कंपनीच्या पाश्र्वभूमीची तपासणी करावी. सर्व आयुर्वमिा कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर ‘डिस्क्लोजर’ अर्थात खुलासेवार प्रकटन दिलेले असते व त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती समाविष्ट असते. योजनेची रचना, ग्राहकसेवेची क्षमता, नेटवर्कची व्याप्ती, ऑनलाइन सुविधा (ऑनलाइन टर्म पॉलिसी खरेदी करायची असल्यास) या काही गोष्टी विचारात घ्याव्यात. दुसरे म्हणजे, विविध योजनांची व त्यातील हप्त्यांची तुलना करून, निवडीस मदत करणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत. परंतु, एका गोष्टीची जराही चिंता करू नये, ती म्हणजे विमा कंपनीचे आíथक आरोग्य. विमा क्षेत्राचे ‘आयआरडीए’द्वारे कडक नियमन केले जाते आणि ग्राहकांना फटका बसू नये म्हणून सर्व कंपन्यांन्या पतविषयक दंडक अर्थात ‘सॉल्व्हन्सी रेशो’ बाळगावा लागतो.
फंडाची कामगिरी
विमा संरक्षासह गुंतवणुकीचे साधन म्हणून कार्य करीत असलेली युलिप खरेदी करताना, कंपनीच्या मागील कामगिरीचा आढावा घेणे गरजेचे आहे. सर्व आयुर्वमिा कंपन्या त्यांच्या फंडांच्या कामगिरीचा तपशील ऑनलाइन पुरवितात. यामध्ये स्थिरता हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. फंडाची चांगली कामगिरी असलेल्या कंपन्यांच्या कामगिरीमध्येही सातत्य दिसेल.
दाव्यांच्या पूर्ततेचे प्रमाण
विमा योजना खरेदी करताना संबंधित कंपनीकडून दाव्यांच्या पूर्ततेच्या (क्लेम सेंटलमेंट रेशो) प्रमाणाचीही चाचपणी गरजेची आहे. परंतु तुम्ही पॉलिसी फॉर्ममध्ये अचूक माहिती दिल्याशिवाय हा मुद्दा तितका प्रभावी ठरणार नाही. अगोदर नमूद केल्याप्रमाणे, विमा क्षेत्रावर कडक नियंत्रण आहे. त्यामुळे योग्य दावा पूर्ण करण्यात न आल्याचा प्रकार क्वचित घडतो. वास्तविक, विमा क्षेत्रातील दावा पूर्ततेचे सरासरी गुणोत्तर ८० टक्क्यांहून अधिक आहे आणि तर बहुतांश कंपन्यांबाबत हे गुणोत्तर ९५ टक्क्य़ांपल्याड आहे.
योजनेचे बारकावे समजून घेणे
तुमच्या गरजा आणि कंपनीच्या मागील कामगिरीनुसार उत्पादनाची निवड केल्यानंतर, योजनेची वैशिष्टय़े समजून घ्यावीत. प्रामुख्याने योजनेचा कालावधी, हप्ता भरण्याचा कालावधी, मुदतपूर्तीची तारीख आणि शुल्क जाणून घ्यावे. योजनेच्या रचनेचे महत्त्वही समजून घ्यावे. प्रत्येक युलिपसोबत १० टक्के व सहा टक्के या प्रमाणात फायदे दर्शविले जातात. त्यातून शुल्क वजा जाता वार्षकिदृष्टय़ा तुमच्या गुंतवणुकीची काय स्थिती असेल ते दिले जाते. या सोप्या पण प्रभावी गोष्टींमुळे साधारणत: निर्माण होणाऱ्या शंका दूर होतील. शिवाय योजना खरेदी केल्यानंतर त्याबद्दल काही शंका असल्यास ‘फ्री लूक पिरियड’ या सुविधेची मदत घेता येऊ शकते. या सुविधेमुळे योजना खरेदी केल्यापासून १५ दिवसांत विमा कंपनीला आपली नापसंती कळवून ती परत देता येते.