निश्चलनीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर पहिल्यांदाच सादर होणा-या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ च्या वर्षअखेरीस देशवासियांशी संवाद साधताना केलेल्या विविध घोषणांनंतर अर्थमंत्री अरूण जेटलींच्या सुटकेसमधून नवीन काय बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कर, तुटीचे गणित, काय स्वस्त आणि काय महाग होणार, प्रत्येक क्षेत्रासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद, पहिल्यांदाच स्वतंत्रपणे सादर न होणा-या रेल्वेच्या वाट्याला काय येणार हे थोड्याच वेळात सादर होणा-या अर्थसंल्पानंतर निश्चित होणार आहे. नोटाबंदीने विकास मंदावल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण अहवालात करण्यात आल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात विकासदरालाही खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, देशात आर्थिक सुधारणा वेगात घडाव्यात असा आग्रहसुध्दा सर्वेक्षणात धरण्यात आल्याने जेटलींच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल हे निश्चित.
Union Budget 2017 LIVE Updates