कला आणि सामाजिक शास्त्रे या विषयांत गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या संस्थांपकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कला शाखा व सामाजिक शास्त्रे या विषयांत संशोधन करणे, लेखन-संशोधनाच्या माध्यमातून ते विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे आणि त्याद्वारे या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाऊंडेशन’कडून चालवली जाते. विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठरावीक आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ही शिष्यवृत्ती खुली असते. याही वर्षी संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाऊंडेशनच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
१ ऑक्टोबर २०१५ आहे.
शिष्यवृत्तीबद्दल : अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाऊंडेशन’ ही संस्था कला क्षेत्रांशी व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील दर्जेदार संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेते. या पुढाकाराचाच एक भाग म्हणून ही संस्था या क्षेत्रांची उत्तम जाण व स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था- ज्यांनी या क्षेत्राला योगदान देत त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशांना आíथक पाठबळ पुरवते. कला क्षेत्रातील अथवा लेखन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना गेटी संशोधन संस्थेत या निवासी शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन-लेखन प्रकल्पाचा कालावधी तीन ते नऊ महिन्यांपर्यंत असू शकतो. प्रत्येक प्रकल्पाचा कालावधी हा त्या-त्या प्रकल्पावर किंवा त्यातील घटकांवर आधारित असतो. शिष्यवृत्तीधारकाला त्याचा प्रकल्प मुक्तपणे करता यावा व त्याच्या स्वत:च्या संकल्पना हव्या तशा राबवता याव्यात याकरता संस्थेने या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक औपचारिकता ठेवलेली नाही. मात्र, शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीत त्याचे संशोधन पूर्ण करणे योग्य राहील. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला संस्थेकडून त्या कालावधीकरता
६५ हजार डॉलर्स वार्षकि वेतन मिळेल. यामध्ये संशोधन निधीचा समावेश असेल. तसेच इतर सोयीसुविधांमध्ये शिष्यवृत्तीधारकाला गेटी संशोधन संस्थेत एक कार्यालय, संस्थेच्या निवासस्थानामध्ये एक अपार्टमेंट, संशोधनासाठी एक सहाय्यक, आरोग्य विमा व येण्या-जाण्याच्या विमानप्रवासाचे शुल्क आदी गोष्टी उपलब्ध केल्या जातील.
आवश्यक अर्हता : ही शिष्यवृत्ती कला, मानववंशशास्त्र व सामाजिक विज्ञानातील विविध विषयांशी निगडित आहे. या विषयांत पदवी-पदव्युत्तर किंवा पीएच.डी. स्तरावरील संशोधन करू इच्छिणाऱ्या विविध देशांच्या अर्जदारांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमानुसार संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर नमूद केलेली आहे. अर्जदाराने स्वत:चा अर्ज उत्तम होण्याकरता त्याने त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र सोबत जोडावे. अर्जदाराची पदवी (किंवा पदव्युत्तर) स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या दोनपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.
अर्ज प्रक्रिया : अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर जमा करावा. अर्ज जमा करताना विद्यार्थ्यांनी अर्जासोबत त्याच्याबद्दल माहिती देणारे ऑनलाइन माहितीपत्रक, स्वत:चा सी.व्ही., तो करू इच्छिणाऱ्या त्याच्या विषयातील संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा अहवाल (फी२ीं१ूँ ढ१स्र्२ं’), तज्ज्ञांची शिफारसपत्रे, शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
निवड प्रक्रिया : अर्जदाराची त्याच्या क्षेत्रातील गुणवत्ता लक्षात घेऊन निवड समितीद्वारे त्याच्या अर्जाची निवड केली जाईल आणि अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना अंतिम मुदतीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
अंतिम मुदत : १ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज करावा.
महत्त्वाचा संदर्भ –
http://www.getty.edu/foundation
itsprathamesh@gmail.com