उद्योगपती आणि महिंद्रा ग्रूपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर फार अ‍ॅक्टिव्ह आहेत. ते रोज नवनवीन आणि हटके गोष्टी शेअर करत असतात. नुकताच त्यांनी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये काढलेला एक फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी नक्कीच ती भारतीय असेल असं म्हटलंय. तुम्हीही हा फोटो पाहिला तर तुमच्याही आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहणार नाहीत.

तुम्ही स्टीलचा डब्बा वापरलाय का कधी? बहूतेक जणांचं उत्तर असेल हो. स्टीलचा डब्बा वापरला नाही असेल असे लोक शोधूनही सापडणार नाहीत. असतील ते मात्र अपवाद. शाळेत दुपारचे जेवण नेण्यासाठी, पिकनिकला घरून जेवण नेण्यासाठी किंवा कामावर जाताना डब्बा न्यायचा असेल तर डब्बा स्टीलचाच वापरला जातो. प्रत्येक भारतीय स्टीलचा डब्बा असतोच. अनेकांच्या तर स्टीलच्या डब्ब्यासोबतच्या आठवणी देखील असतील. आता हे सांगण्याचं कारण काय, तर आनंद महिंद्रांनी शेअर केलेला फोटो. हा फोटो भारतातला नाही तर न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधला आहे.

या फोटोत एक महिला न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमधून चालत आहे. तिचा चेहरा फ्रेममध्ये दिसत नाहीए. तिने फॉर्मल कपडे घातलेले आहेत. कदाचित ती ऑफीसला जात असावी. यात इंटरेस्टिंग म्हणजे तिने हातात स्टीलचा टिफिन बॉक्स म्हणजेच डब्बा घेतला होता. भारतात सगळीकडे स्टीलच्या डब्बाच्या वापर केला जातो. परदेशात अशा पद्धतीने स्टीलचा डब्बा घेऊन जाताना कोणी दिसत नाही. त्यामुळे न्यूयॉर्कमधील महिलेला हातात स्टीलचा डब्बा घेऊन जाताना पाहून नेटकऱ्यांनी देखील महिंद्रांच्या ट्विटवर मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने म्हटलंय, “ती नक्कीच भारतीय असेल. फक्त भारतीयांनाच घरचे बनवलेले जेवण आवडते.” तर, काही नेटकऱ्यांनी स्वतःजवळ असलेल्या स्टीलच्या डब्ब्याचे फोटो ट्विट केले आहेत. एका युजरने म्हटलं, “तिच्या डब्ब्यात आज काय असेल बरं. वरण-भात, बर्गर की सॅण्डविच.” अनेकांनी महिंद्रांचे हे ट्विट शेअर देखील केले आहे.

Story img Loader