पारशी समुदायातील घटत्या लोकसंख्येचा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्र सरकारने ‘जियो पारसी’ या थिम अंतर्गत या समुदायाला लोकसंख्या वाढीसाठी प्रेरित करणाऱयासाठी काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु, यातील काही जाहिरातील वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत.
एका जाहिरातीत थेट कंडोम न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय, पारशींनी लग्न करुन मुलांना जन्म दिला नाही तर लवकरच पारशी कॉलनीचे हिंदू कॉलनीत रुपांतर होईल, अशीही एक वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
देशाच्या लोकसंख्येत पारशींची संख्या चिंताजनक आहे. आकडेवारीनुसार मुंबईमध्ये फक्त ४० हजार पारशी शिल्लक आहेत. २००१ च्या जणगणनेनुसार ही संख्या ७० हजार इतकी होती. पारशी समुदायाची संख्या कमी असण्याचे प्रमुख कारण त्यांच्यात उशीरा होणारे विवाह. त्याशिवाय अनेक जण अविवाहित राहाण्यालाच पसंती देतात किंवा एकच अपत्य राहु देतात आणि धर्माबाहेर लग्न करण्यामुळे पारशींची संख्या कमी झाली आहे. याच कारणांचा वेध घेऊन ‘जियो पारसी’ अंतर्गत या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत.
जाहिरातीमध्ये चाळीशी पार झाल्यानंतरही आईसोबत राहणार्‍या अविवाहित पुरुषांची ‘तुम्ही तुमच्या आई सोबत ब्रेकअप घेण्याची ही योग्य वेळ नाही का?’, असे म्हणत  अविवाहित पुरूषांची एकप्रकारे टिंगल उडवण्यात आली आहे. त्याशिवाय योग्य पुरुषाच्या शोधात लग्नाचे वय होऊन गेलेल्या महिलांवरही ‘तुमचा बॉयफ्रेंड काय रतन टाटांसारखा यशस्वी होणार आहे? त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणार्‍या तुम्ही कोण आहात, निकोल किडमन?’ असे म्हणण्या आले आहे.
पारशींच्या लोकसंख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक मंत्रालयाने २०१३ साली एक योजना तयार केली. त्यासाठी मंत्रालयाने १० कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला. या योजनेंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून या जाहिराती सुरु झाल्या आहेत.
‘जियो पारसी’च्या जाहिराती-
jiyo-parsi4_page_15_thumbparsi1

Story img Loader