चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे.
तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तेथील विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेत विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना गणित व भौतिकशास्त्र तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना गणित व चिनी भाषा हे विषय परीक्षेला असतील. त्सुंगहुआ विद्यापीठाचे प्रवेश अधिकारी यू हान यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी इंग्रजी काढून टाकण्यात आले आहे. विशिष्ट विषयात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे संधी मिळेल. त्सुंगुहुआ विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ व बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या तीन विद्यापीठांची प्रवेश परीक्षा ही राष्ट्रीय परीक्षेच्या तीन महिने अगोदर होत असते.
प्रवेश परीक्षेतून चीनचा इंग्रजीला डच्चू
चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे. तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तेथील विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेत विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना गणित व भौतिकशास्त्र तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना गणित व चिनी भाषा हे विषय परीक्षेला असतील.
First published on: 17-03-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English dropped from chinese university exams