हफिंग्टन पोस्टने जाहीर केलेल्या जगभरातील सत्ताधारी श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव हटवून त्यांची माफी मागितली आहे.  
सोनिया गांधी या इंग्लंडची राणी एलिझाबेथ, ओमानचे सुलतान आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा दावा केला होता. यानंतर झालेल्या टीकेनंतर अखेर हफिंग्टनने त्यांचे नाव हटविले आणि आम्हाला देण्यात आलेली माहिती सर्वस्वी आमची नसून सोनिया गांधी यांच्या संपत्ती बद्दल तिसऱया व्यक्तीकडून माहिती देण्यात आली होती. त्याआधारे आम्ही ही आकडेवारी जाहीर केली होती असा खुलासाही हफिंग्टनने दिला आहे.
हफिंग्टनने कोणतीही पडताळणी न करता जाहीर केलेल्या या चुकीच्या माहितीवर ट्विटरकरांनीही ट्विटच्या माध्यामातून नाराजी व्यक्ती केली आहे.

Story img Loader