यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी या राणी एलिझाबेथ, ओमानचे सुलतान आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा दावा हफिंग्टन पोस्टने केला आहे.
जगभरातील राजे, राणी, अध्यक्ष, सुलताना यांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केल्यानंतर एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांत सत्तेवर असलेल्या २० नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात सोनिया गांधी १२व्या स्थानावर आहेत. हफिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार, सोनिया गांधी यांच्या नावावर २ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती आहे. यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ४० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे.
या २० जणांच्या यादीत सोनिया गांधी राणी एलिझाबेथ, ओमानचे सुलतान आणि कुवेतचे शेख यांच्याही पुढे आहेत. हफिंग्टन पोस्टने सोनियांच्या संपत्तीबाबत हा खुलासा केला असला तरी, भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्यांच्या संपत्तीचे आकडे काही वेगळेच आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, सोनिया गांधीकडे १.३८ कोटी रुपयांची संपत्ती असून, भारतात त्यांच्या नावावर एकही घर किंवा कार नाही. 

Story img Loader