मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या ४.९ किलो सोने घेऊन जाणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाला महसूल गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. या सोन्याचे बाजारभावानुसार १.२९ कोटी रूपये इतके मूल्य आहे. कबादशा मोहम्मद फवाज असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो दुबईहून सोन्याची ४२ बिस्किटे घेऊन भारतात आला होता. बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास फवाज हा दुबईवरून आलेल्या विमानातून मुंबईत उतरला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रामेश्वरम येथे एका व्यक्तीकडून सुमारे २.३० कोटी किमतीचे ८.३ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केले होते. ही व्यक्ती श्रीलंकेहून सोन्याची बिस्किटे घेऊन येत होती. मदुराई आणि तुतीकोरिन येथील गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना एक व्यक्ती कारमधून सोने घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मदुराई-रामेश्वरम महामार्गावर रामेश्वरपासून ४० किलोमीटर दूर अंतरावर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणी ३१ वर्षीय मुजीबूर रेहमान याला अटक केली. तो एर्नाकूलमजवळील उचीपुली येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सोन्यासह कारही जप्त केली असून पुढील तपास केला जात आहे.

medical room, new terminal, Pune airport,
हवाई प्रवाशांवर आता तातडीने उपचार! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यान्वित
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
CISF jawan bitten on hand by female passenger at airport
विमानतळावर महिला प्रवाशाकडून जवान महिलेच्या हाताचा चावा, महिला जवानाला धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा
Cocaine, Mumbai, shampoo bottle,
मुंबई : शॅम्पूच्या बाटलीत सापडले २० कोटींचे कोकेन, परदेशी महिलेला अटक
Pune Airport, | ASQ Index| Pune Airport ASQ Index decline| passenger facilities
केंद्रीय हवाई राज्यमत्र्यांच्या पुण्यातील विमानतळच नापास!
Thane | Rickshaw Drivers Threaten Indefinite Strike | Indefinite Strike of Rickshaw Drivers
ठाणे शहरातील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा, दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी
Kamathipura, rehabilitated building,
मुंबई : कामाठीपुऱ्यात ५८ मजली पुनर्वसित इमारती, तर विक्री योग्य इमारती असणार ७८ मजल्याच्या
Shilphata, traffic jam, heavy vehicles,
अवजड वाहनांमुळे दिवसा शिळफाटा वाहतूक कोंडीत, अवजड वाहतुकीच्या वेळेच्या नियमावलीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष