आपण कृष्णाच्या भूमीतील रहिवासी असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील यादव मतदारांना साद घातल्याच्या दुसऱ्याच दिवशी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदींना ‘कालिया नाग’ संबोधून ‘आम्ही त्यांना ठेचून काढू’, असे म्हटले आहे.
कृष्णाने कालिया नागाला ठार मारले होते. तोच नाग आता नरेंद्र मोदी म्हणून पुन्हा जन्माला आला असून साऱ्या बिहारला डसू पाहात आहे. आम्ही यदुवंशीय (यादव कुळातील लोक) त्याला पुन्हा चिरडून टाकू आणि त्याच्या पक्षाला ज्यातून उखडून फेकून देऊ, असे लालू पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
केंद्र सरकारने जातीवर आधारित जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी या मागणीसाठी लालूप्रसाद यांनी रविवारी दिवसभराचे उपोषण केले. लालूप्रसाद टांग्यात बसून गांधी मैदान या उपोषणस्थळी पोहोचले. याच टांग्यांमधून पक्ष निवडणुकीचा प्रचार करणार आहे.
मोदी हे कालिया नाग – लालूप्रसाद
कृष्णाने कालिया नागाला ठार मारले होते. तोच नाग आता नरेंद्र मोदी म्हणून पुन्हा जन्माला आला असून साऱ्या बिहारला डसू पाहात आहे. आम्ही यदुवंशीय (यादव कुळातील लोक) त्याला पुन्हा चिरडून टाकू

First published on: 27-07-2015 at 06:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi is kaliya nag says lalu