अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी मुस्लीम मुलींना हिजाब (हेडस्कार्फ) वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मुस्लीम लीगने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना न्यायालयाला धार्मिक बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना वैद्यकीय परीक्षेसाठी हिजाब किंवा स्कार्फ वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. हिजाब न वापरल्यामुळे विद्यार्थ्यांची धार्मिक भावना संपुष्टात येणार नाही असेही न्यायालयाने सांगितले होते.
या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी मुस्लीम लीगचे राष्ट्रीय सचिव ई. मुहम्मद न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले की, हा भावनेचा विषय असून न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. न्यायालयाचा निर्णय मुस्लीम धर्माच्या विरोधी आहे.
‘हिजाब’च्या मुद्दय़ावरून मुस्लिम लीगची सर्वोच्च न्यायालयावर टीका
अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी मुस्लीम मुलींना हिजाब (हेडस्कार्फ) वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मुस्लीम लीगने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका ...

First published on: 27-07-2015 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim league says supreme court has no right to interfere in matters of faith