पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधत पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या असल्या तरी लवकरच २ हजार रुपयांच्या नोटा आणल्या जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईदेखील पूर्ण झाली आहे. मात्र या नोटा फक्त कागदाच्या नोटा असणार नाहीत. या नोटांची रचना अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसणार आहे.
काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. लवकरच व्यवहारात येणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी (नॅनो जीपीएस चीप) असेल.
एनजीसी तंत्रज्ञान कसे काम करणार ?
या नव्या तंत्रज्ञानाला काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उर्जेची आवश्यकता असणार नाही. एनजीसी फक्त सिग्नल परावर्तनाचे काम करेल. जेव्हा उपग्रहाकडून एनजीसीकडे त्याचे स्थान जाणून घेण्यासाठी संदेश पाठवला जाईल, तेव्हा दोन हजाराच्या नोटमध्ये असणारी एनजीसी उपग्रहाला सिग्नल पाठवेल. यामुळे नोट नेमकी कुठे आहे, तिचा सिरीअल नंबर नेमका काय आहे, याची माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे ही नोट जमिनीखाली १२० मीटर असेल तरी ती शोधून काढता येणे शक्य असेल. एनजीसी यंत्रणा नोटमधून काढता येणार नाही.
यामुळे काळा पैसा कसा रोखला जाणार ?
दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी असेल. त्यामुळे प्रत्येक नोट नेमकी कुठे आहे, हे शोधता येईल. शिवाय या नोटेच्या आजूबाजूला नेमकी किती रक्कम साठवून ठेवण्यात आली आहे, याची माहितीदेखील मिळू शकणार आहे. एखाद्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या जवळ जर मोठी रक्कम बऱ्याच कालावधीपासून असल्याचे आढळून आले, तर त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल आणि याचा तपास सुरू होईल.