देशातील कायदा व्यवस्थेचे राज्य बळकट होण्यासाठी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असण्याची गरज आहे. त्यासाठी देशाच्या न्यायसंस्थेची एकसंधता अबाधित राखणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी शनिवारी दिल्ली येथे केले. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याविषयी भाष्य करताना देशातील न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा दृढ विश्वास लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी न्यायाधीशांना आमिष दाखवण्याचे प्रकार थांबविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.