परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पाठीशी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘राज्य धर्म’ पाळण्याऐवजी ‘राजे धर्म’ पाळत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
स्वराज आणि वसुंधराराजे यांच्या हकालपट्टीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी, नरेंद्र मोदी यांनी ‘राज्य धर्म’ पाळला पाहिजे, ‘राजे धर्म’ अथवा ‘ललित धर्म’ पाळू नये, असे आवाहन केले.
लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मोठी आश्वासने देण्यात आली, मात्र भ्रष्टाचार आणि काळा पैसा याबाबत नरेंद्र मोदी यांनी निराशा केली. या प्रश्नांवर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना मोदी संरक्षण देत असल्याचा आरोप अजय कुमार यांनी केला.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जाला गुप्तपणे पाठिंबा देऊन वसुंधरा राजे यांनी देशविरोधी कृत्य केले आहे, असेही प्रवक्ता म्हणाला.
मोदींनी ‘राज्य धर्म’पाळावा, ‘राजे धर्म’ नाही
नरेंद्र मोदी हे सध्या 'राजधर्मा'ऐवजी 'राजेधर्मा'चे पालन करत असल्याची खोचक टीका काँग्रेसकडून शनिवारी करण्यात आली.
First published on: 28-06-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi following raje dharma not rajya dharma taunts congress