सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवाईविरोधात मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. या निकालामुळे विजय मल्ल्या यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. परदेशी चलन नियमाच्या उल्लंघनाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून विजय मल्ल्या यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि न्या. आदर्श के. गोयल यांच्या पीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
किंगफिशर मद्याच्या जाहिरातीसाठी दोन लाख डॉलर ब्रिटिश फर्मकडे हस्तांतरित केल्याच्या आरोपांनंतर सक्तवसुली संचालनालयाने त्यांना नोटीस बजावली होती. फॉर्म्युला वन रेसमध्ये किंगफिशर बिअरचा लोगो लावण्यासाठी ही रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे.
विजय मल्ल्या यांना पुन्हा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवाईविरोधात मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली.
First published on: 13-07-2015 at 12:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc dismisses vijay mallyas appeal against ed proceedings in fera case