जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा येथे आज चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. जवानांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. दुसरीकडे बीएसएफच्या जवानांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला टिपले आहे.
#UPDATE: Two terrorists gunned down by Army in Bandipora(J&K), combing operation underway
आणखी वाचा— ANI (@ANI) November 22, 2016
New Rs 2000 notes recovered from terrorists gunned down by Army in Bandipora(J&K) today. pic.twitter.com/l9y1xqyoem
— ANI (@ANI) November 22, 2016
Pakistani intruder killed in RS Pura sector(J&K). He was challenged by troops and was shot when he did not pay heed: BSF
— ANI (@ANI) November 22, 2016
Arms & ammunition recovered by Army from terrorists gunned down in Bandipora (J&K) today pic.twitter.com/i1X9izIfhq
— ANI (@ANI) November 22, 2016
आरएसपुरामध्ये पाकिस्तानी घुसखोरांबाबतची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना इशारा दिला. पण घुसखोरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. त्यात एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. दुसरीकडे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर काश्मीरमधील बांदीपुरामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले.या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान सध्या चकमक संपली आहे. मात्र, जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात आणखी दोन दहशतवादी दडून बसले आहेत. त्यामुळे जवानांनी शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे. दरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
दहशतवाद्यांकडे नवीन २००० च्या नोटाही सापडल्या
बांदीपुरा येथे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडे २००० रुपयाच्या नवीन नोटाही सापडल्या आहेत.