पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. त्यामुळे सध्या फक्त या पक्षाची चर्चा पाहायला मिळत आहे. पुढच्या काही महिन्यांत आता दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यावरूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्ला चढवला आणि भाजपा त्यांच्या पक्षाला घाबरत असल्याची टीका केली आहे.
“…तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल;” अरविंद केजरीवाल यांचं भाजपाला आव्हान
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. त्यामुळे सध्या फक्त या पक्षाची चर्चा पाहायला मिळत आहे. पुढच्या काही महिन्यांत आता दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यावरूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्ला चढवला आणि भाजपा त्यांच्या पक्षाला घाबरत असल्याची टीका केली आहे.
केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले, ‘काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो. आम्ही सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही घोषणा आमच्यावर केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपा सावरकर आणि हेडगेवार यांचे फोटो का लावत नाही, असं विचारत आहेत.तर, काँग्रेसवाले इंदिरा आणि सोनिया गांधींचे फोटो का लावत नाहीत, असे विचारत आहे. आम्ही म्हणालो की, तुम्ही तुमच्या आवडीचे फोटो लावा,’ असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपाला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘हिंमत असेल तर निवडणुका वेळेवर घ्या आणि जिंकून दाखवा, तुम्ही निवडणुका जिंकल्या तर आम्ही राजकारण सोडू. भाजपा स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्यात हिंमत नाही,’ अशी टीका केजरीवाल यांनी केली.
केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले, ‘काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो. आम्ही सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही घोषणा आमच्यावर केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपा सावरकर आणि हेडगेवार यांचे फोटो का लावत नाही, असं विचारत आहेत.तर, काँग्रेसवाले इंदिरा आणि सोनिया गांधींचे फोटो का लावत नाहीत, असे विचारत आहे. आम्ही म्हणालो की, तुम्ही तुमच्या आवडीचे फोटो लावा,’ असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपाला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘हिंमत असेल तर निवडणुका वेळेवर घ्या आणि जिंकून दाखवा, तुम्ही निवडणुका जिंकल्या तर आम्ही राजकारण सोडू. भाजपा स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्यात हिंमत नाही,’ अशी टीका टीका केजरीवाल यांनी केली.