How Do Dogs Recognize Stress By Smell: अनेकदा तणावग्रस्त व्यक्ती वरून हसताना पाहायला मिळतात. एखाद्याच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याची शक्ती असती तर बहुधा आजवर अनेक आत्महत्येचे प्रकार कमी झाले असते. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीही आपला ताण व चिडचिड समजून घेऊ शकत नाहीत पण निसर्गाची किमया म्हणजे हीच शक्ती कुत्र्यांना देण्यात आली आहे. तुम्हाला ठाऊक आहे का की, पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सने नव्याने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की कुत्रे माणसाचा तणाव वासाने सुद्धा ओळखू शकतात.

क्वीन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट येथील पीएचडी विद्यार्थिनी, क्लारा विल्सन यांनी सांगितले की “जेव्हा एखादी व्यक्ती तणावग्रस्त असते तेव्हा तिच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचा दर्प तयार होत असतो. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजेच एखाद्या गंभीर घटनेनंतर येणारा तणाव अनुभवणाऱ्या अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडून सर्व्हिस डॉग म्हणजेच माणसांना भावनिक आधार देण्यासाठी प्रशिक्षित श्वानांसह राहण्याचा सल्ला दिला जातो.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

तणाव म्हणजे नेमकं काय?

‘तणाव’ हा शब्द आव्हानात्मक परिस्थिती अशा अर्थाने घेण्यात आला आहे. एखादी व्यक्ती जी शारीरिक किंवा मानसिक आव्हानांमुळे त्रासलेली आहे तिला तणावग्रस्त असे म्हणता येईल. अनेकदा अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. पण जर आपण या नकारात्मक विळख्यात अडकून राहिलात तर काही कालावधीने यातून अन्य शारीरिक आजारही उद्भवण्याची शक्यता असते. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार अनेकदा तणावामुळे रक्तदाब घटण्याची तसेच हृदयाची गती वाढण्याचे धोके असतात.

तणाव व भावनांचा उद्रेक

तणाव ही एक भावना आहे असे सांगणाऱ्या या अभ्यासात नकारात्मक तणाव या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. तणावग्रस्त व्यक्ती या कोणत्याही परिस्थितीत अधिक भावुक होतात असेही या अभ्यासातून दिसून आले आहे. अनेकदा या भावनांमागे भीती हा मूळ भाव असतो. जेव्हा आपल्या शरीरात भीतीमुळे भावना वाढतात त्यावेळी वैज्ञानिक दृष्टीने रक्त व हार्मोन्सचा प्रवाहही बदलतो, परिणामी या जलद क्रियेने एक विशिष्ट गंध तयार होतो.

कुत्रे कसे ओळखतात मानवी भावना?

अनेकदा जवळच्या व्यक्तीला तुमच्या भावना कळू शकल्या नाहीत तरी कुत्रे हे शरीरातील बदल लगेच ओळखतात. ज्याप्रमाणे काही प्राण्यांना दूरच्या दृष्टीची, काहींना लांबून ऐकण्याची शक्ती असते त्याप्रमाणेच कुत्र्यांना भावनिक बदल ओळखण्याची शक्ती मिळाली आहे. कुत्रे दृश्य व गंध यांच्या आधारे मानवी भावना समजून घेऊ शकतात. VCA प्राण्याच्या रुग्णालयातील पशुवैद्य रायन ल्लेरा व लिन बुझार्ड यांनी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या ज्ञानेंद्रियातील रिसेप्टरच्या पेशी ६० लाखापर्यंत असतात मात्र कुत्र्यांमहदये ही संख्या १ कोटी इतकी आहे. तसेच गंधावरून बदल ओळखण्याची मेंदूमधील क्षमताही माणसांपेक्षा ४० पटअधिक आहे.

कुत्रे आजारही ओळखू शकतात का?

जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा त्यातूनच काही सेंद्रिय अंशही बाहेर पडतात. या अंशांचा गंध ओळखून कुत्रे तुमचा तणाव व इतरही आजार समजून घेऊ शकतात. सहसा अशा प्रकारचे सेंद्रिय अंश हे आपल्या मूत्र, विष्ठा व लाळेत असतात, त्यामुळे या तीन घटकाच्या आधारे ओळखता येणारे आजार हे कुत्रे केवळ गंधावरून ओळखू शकतात. फुफ्फुस, मूत्राशय व स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी याची मदत होते.

मेडिकल डिटेक्शन डॉग्स या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक क्लेअर गेस्ट, सांगतात की ” सर्व्हिस डॉग आपला तणाव व आजार ओळखून वेळीच सतर्क करू शकतात यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले असते. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी या श्वानांच्या सेवेचा वापर होतो.

कुत्रे भावना ओळखू शकतात हे सांगणारा अभ्यास नेमका घडला कसा?

कुत्रे मानवाचा तणाव व आजार ओळखू शकतात का हे पाहण्यासाठी घेण्यात आलेल्या अभ्यासात ३६ तणावग्रस्त व तणावमुक्त सहभागींचे घाम व श्वासाचे नमुने गोळा करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात कुत्र्याला तणावाचा नमुना शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. यात जेव्हा कुत्र्यांना हे नमुने प्रत्यक्ष दाखवण्यात आले तेव्हा त्यांच्याकडून तणावग्रस्त व तणावमुक्त असे विभाजन करून नमुने ओळखण्यात आले. ७२० चाचण्यांपैकी ६७५ मध्ये तणावाचा नमुना या कुत्र्यांनी अचूक निवडल्याने दिसून आले.