बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा इमरान, ‘जन्नत २’, ‘राज २’, ‘द डर्टी पिक्चर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाला. मात्र, २०१२ साली प्रदर्शित ‘शांघाय’ चित्रपटाने त्याच्या अभिनय कौशल्याचे समीक्षकांनी कौतुक केले. इमरानने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये या बदलाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.