|
कामटे-मारिया वाद ; आर. आर. पाटील मध्यस्थी करणार
|
|
|
|
सांगली, २८ नोव्हेंबर / प्रतिनिधी शहीद आशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांच्या ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातील संदर्भावरून गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याबाबत निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत. असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आर. आर. पाटील म्हणाले की, राकेश मारिया हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यावर झालेल्या कथित गंभीर आरोपांनी पोलीसदल काहिसे द्विधा मनस्थितीत आले आहे. यासंदर्भातील वस्तुनिष्ठ परिस्थिती आपण विनिता कामटे व राकेश मारिया यांच्याकडून समजून घेऊ व निर्माण झालेला वाद संपुष्टात आणण्याची जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडू. पोलीस दलात कोणतेही मतभेद नाहीत, असे ते म्हणाले. *जॅकेटच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी दशहतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या हरवलेल्या बुलेटप्रूफ जॅकेट प्रकरणी त्यांच्या पत्नीची आपण केवळ माफी मागू शकतो, असे वक्तव्य केल्यानंतर खडबडून जागे झालेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हरवलेल्या जॅकेटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्यावेळी घातलेल्या जॅकेटच्या दर्जाबाबत व गहाळ होण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतरच आर. आर. पाटील यांनी जॅकेट हरविण्याच्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
|