मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> सव्‍‌र्हर विलंबाचे मांजर
 

गाथा

 



लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’
स्पर्धेसाठी अटी व शर्ती

 

सव्‍‌र्हर विलंबाचे मांजर Bookmark and Share Print E-mail
‘कॅट’ प्रारंभीच आडवे!
पुणे, २८ नोव्हेंबर/विशेष प्रतिनिधी

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या विश्वविख्यात संस्थेसह देशभरातील सुमारे सव्वाशे व्यवस्थापन संस्थांमधील प्रवेशाकरिता संगणकाद्वारे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (कॅट) पहिल्याच दिवशी सव्‍‌र्हर विलंबाचे मांजर आडवे गेले! मुंबईतील सरस्वती कॉलेज व पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयासह देशभरातील पाच शहरांमध्ये तांत्रिक व्यत्यय आल्याने विद्यार्थ्यांसह संयोजकांची खरोखरीच ‘परीक्षा’ पाहिली गेली.
तांत्रिक विलंबाचा एकाही विद्यार्थ्यांला फटका बसू दिला जाणार नसून आजच्या पहिल्या सत्रात समस्या उद्भवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत एकाच दिवशी देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘कॅट’चे लेखी परीक्षेच्या स्वरूपात आयोजन केले जात होते. यंदा प्रथमच संगणकाधारित पद्धतीने ‘कॅट’ घेण्यात येत असून, त्यासाठी ३२ शहरांमधील १०५ केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. संगणकाधारित स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून (लॅन) २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या मुदतीत कधीही परीक्षा देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज सकाळी प्रथमच ‘ऑनलाईन कॅट’साठी विद्यार्थ्यांसह संयोजकही सज्ज झाले होते; परंतु पहिल्याच सत्रामध्ये मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, कोलकाता, भोपाळ आदी ठिकाणी ‘सव्‍‌र्हर हँग’ होण्याचे प्रकार घडले. संगणकावर प्रश्नपत्रिका सोडविण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांचा संबंधित संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्कच प्रस्थापित केला जात नव्हता. या परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सव्‍‌र्हरच्या कार्यप्रणालीमधील दोषामुळे हा विलंब होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.   
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या

दिनदर्शिका

मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी.
मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल.
शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.