मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त >> ‘माझे अमेरिकेतील काही दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन
 


स्पर्धेचे नियम व अटी




‘माझे अमेरिकेतील काही दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन Bookmark and Share Print E-mail
औरंगाबाद, २७ जून/खास प्रतिनिधी
मनोरमा जिलठे लिखित ‘माझे अमेरिकेतील काही दिवस’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र   विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते झाले.
या वेळी प्रा. बाबा गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ल. बा. रायमाने हे अध्यक्षस्थानी होते. या पुस्तकाने दलित साहित्यात एक नवीन पर्व निर्माण केले आहे. हे पुस्तक केवळ प्रवास वर्णन नसून अमेरिकन आणि भारतीय जीवन यातील बारकाव्यांनी भरलेले आहे. या पुस्तकाने एकंदरित साहित्याच्या नुसत्या कक्षाच रुंदावल्या नसून साहित्याला एका उंचीपर्यंत पोहोचविले आहे, असे डॉ. सुधीर गव्हाणे या वेळी बोलताना म्हणाले. या पुस्तकात लेखिकेच्या एकंदरित पाच पिढय़ांचे वर्णन आले आहे. या पिढय़ा एकमेकांशी अनुभवाच्या वेगवेगळ्या पातळ्यांनी जोडल्या गेल्या आहेत. पाचवी पिढी अमेरिकेत स्थायिक असेल. तिचे भारताशी काय संबंध असतील हे आज सांगता येणार नाही. परंतु हा विकासाचा प्रवास मानला पाहिजे, असे डॉ. ल. बा. रायमाने यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले. प्रारंभी लेखिका मनोरमा जिलटे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.