|
|
|
लावणी महोत्सवांची वाढ केवळ संख्यात्मक
|
|
|
|
|
अभ्यासकांची टीका सुनील डिंगणकर - बुधवार, २८ जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लावणी या लोककलाप्रकाराला अलीकडे चांगलाच प्रेक्षकवर्ग लाभला आहे. वर्तमानपत्रांतील नाटक-सिनेमाच्या जाहिरातींच्या पानावर नजर टाकली तर लावणीवरील तीन-चार कार्यक्रमांच्या जाहिराती सहज दिसून येतात. अशाच एका ‘खटय़ाळ घुंगरू’ या लावणीच्या कार्यक्रमाचे ५० प्रयोग पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लावणी महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे निर्माते सुधाकर नार्वेकर यांनी सांगितले. याचा पहिला कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये होणार आहे.
महोत्सवांची संख्या वाढत असली तरी ही केवळ संख्यात्मक वाढ असून गुणात्मक वाढ होत नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. लावणी महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी होणाऱ्या एकूण ११ प्रयोगांमध्ये अप्सरा जळगावकर, वर्षां संगमनेरकर, संजिवनी मुळे-नगरकर, शीतल नागपूरकर, सोनाली जळगावकर, मेघा घाडगे, देवयानी आणि आकांक्षा कदम सहभागी होणार आहेत. बोनस म्हणून या कार्यक्रमांमध्ये विजय कदम, आशिष पवार, सतीश तारे, भूषण कडू हे ‘कॉमेडी एक्स्प्रेस’चे शिलेदारही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. नार्वेकर म्हणाले की, लावणीच्या कार्यक्रमांची लाट आली असली तरी प्रेक्षकवर्ग मात्र अस्सल लावणीच्या कार्यक्रमांनाच गर्दी करतात. या लावणी महोत्सवात पारंपरिक लावणी सादर केली जाणार आहे. यात गाणी गाऊन त्यावर लावणीनृत्य सादर करणे आणि बैठकीची लावणी हे दोन्ही कलाप्रकार सादर करण्यात येतील. त्याचप्रमाणे चित्रपटातील गाजलेल्या लावण्यांचाही यात समावेश करण्यात येणार असल्याचे नार्वेकर म्हणाले. त्यांच्या मते काही लावण्यांच्या कार्यक्रमात केवळ रेकॉर्ड नृत्ये केली जातात. या लावणी महोत्सवात मात्र अस्सल लावण्या सादर होणार असून या कार्यक्रमांसाठी प्रेक्षक सहकुटुंब उपस्थित राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोककलातज्ज्ञ प्रकाश खांडगे यांनी या घाऊक संख्येने सादर होणाऱ्या लावणीच्या कार्यक्रमांबद्दल असमाधान व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये केवळ चित्रपटगीतांवर आधारित लावण्या सादर होत असून पारंपरिक लावण्यांची संख्या कमी होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, केवळ अकलूज येथे भरणारा लावणी महोत्सव आणि शासनातर्फे भरविण्यात येणारा लावणी महोत्सव या दोनच ठिकाणी पारंपरिक लावण्या सादर होतात. बाकीच्या ठिकाणी सादर होणाऱ्या लावण्या या ‘लावण्या कम आयटम नंबर’ आहेत. पारंपरिक लावणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. त्या पारंपरिक लावणीचे जतन करणे आणि नव्या लावण्यांची निर्मिती केली तरच हा लोककलाप्रकार मूळ स्वरूपात टिकून राहील, असे मत खांडगे यांनी व्यक्त केले.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|