ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विक्रमांचे बादशाह भाऊसाहेब निंबाळकर यांचं आज (मंगळवार) कोल्हापुरात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते.   रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा भाऊसाहेब निंबाळकर (नाबाद ४४३) यांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे निंबाळकर यांची सर्वाधिक ४४३ धावांची खेळी पुण्यामध्ये १९४८-४९ साली काठियावाडविरुद्ध केली होती.
भाऊसाहेब हे महाराष्ट्राच्या रणजी संघातर्फे खेळत असत. निंबाळकर यांचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ते त्यांच्या नाबाद ४४३ धावांच्या मॅरेथॉन खेळीसाठी. १९४८-४९ साली रणजी करंडक स्पधेर्त महाराष्ट्रातर्फे खेळताना त्यांनी काठियावाडविरुद्ध हा पराक्रम केला होता. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये एका डावात नाबाद ४४३ धावांचा विक्रम भाऊसाहेबांच्या नावावर आहे.
निंबाळकर अधिकृतरीत्या कसोटी खेळू शकले नाहीत.  पणा रणजी स्पर्धेत त्यांनी सहा संघांचे प्रतिनिधीत्व केले आणि ५६.७२ च्या सरासरीसह एकूण ८० डावांच्या कारकिर्दीत त्यांनी ४ हजार ८४१ धावा केल्या. त्यात १२ शतकांचा तर २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
भाऊसाहेब निंबाळकर यांची अनुक्रमे २००२ आणि २००३ सालच्या कर्नल सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड झाली होती.

Story img Loader