* कल्पना तेंडुलकर यांना जिजामाता पुरस्कार * स्नेहल साळुंखे, सुवर्णा बारटक्के, धनंजय महाडिक, क्षिप्रा जोशी यांना शिवछत्रपती पुरस्कार * स्वप्नाली यादव आणि संजय टकले यांना साहसी पुरस्कार
निवडणुकीचा मोसम जवळ आला की, मतदारांना भुलवण्यासाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतात, याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कारांच्या वेळीही आला. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणाऱ्या राज्य सरकारला अखेर तीन वर्षांनी पुरस्कारासाठी मुहूर्त सापडला आणि सोमवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून खेळाडू, संघटक, प्रसारमाध्यमे या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी करावी, यासाठी पाठपुरवठा करत होती, पण गेली तीन वर्षे या साऱ्यांना न जुमानणाऱ्या सरकारने अखेर निवडणुकींच्या काही दिवसांपूर्वी घोषणा करत अनोखी ‘खेळी’ खेळली आहे. या घोषणेमुळे तीन वर्ष अडकून ठेवलेल्या पुरस्कारातून अखेर ‘शिवछत्रपती’ मुक्त झाले, अशी प्रतिक्रीया क्रीडा क्षेत्रात व्यक्त करण्यात येत होती.
या पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने कुस्तीचे ज्येष्ठ संघटक बाळासाहेब लांडगे (२००९-१०), अटल बहादूर सिंग (२०१०-११) आणि ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (२०११-१२) यांना गौरवण्यात आले. वर्षां उपाध्ये, नरेंद्र कुंदर यांच्या अन्य सहा जणांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्पना तेंडुलकर यांच्यासह चार जणांचा जिजामाता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्नेहल साळुंखे, सुवर्णा बारटक्के, धनंजय महाडिक, क्षिप्रा जोशी यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर स्वप्नाली यादव आणि संजय टकले यांना साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुरू-शिष्याचा सन्मान
जिम्नॅस्टिक या खेळाला मोलाचे योगदान देणाऱ्या वर्षां उपाध्ये आणि त्यांची शिष्या क्षिप्रा जोशी यांना एकाच वर्षी शिवछत्रपती पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०११-१२ या वर्षांसाठी उपाध्ये यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला, तर याच वर्षांसाठी क्षिप्राला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

पिता-पुत्रांची शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी
श्रीरंग इनामदार आणि शंतनू इनामदार या पिता-पुत्रांच्या जोडीला शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालण्याचे भाग्य मिळाले आहे. शंतनू याला खो-खोसाठी २००९-१० सालासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला
आहे.   यापूर्वी कबड्डीमध्ये जया शेट्टी, त्यांच्या पत्नी छाया शेट्टी आणि त्यांचा मुलगा गोरव शेट्टी यांनाही यापूर्वी छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू अशोक मंकड आणि त्यांचा मुगला हर्ष मंकड यांनाही छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अरूण केदार आणि अनुपमा केदार या दाम्पत्यालाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

शिवछत्रपती पुरस्कारांची गटवार यादी
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)
बाळासाहेब लांडगे, पुणे (२००९-१०),
अटल बहादूर सिंग, नागपूर (२०१०-११)
भीष्मराज बाम, नाशिक (२०११-१२ )

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)
(२००९-१०) :  तपनकुमार पाणिग्रही, जलतरण
 अशोक कोंडाजी दुधारे, तलवारबाजी
चंद्रकांत भालचंद्र जाधव, खो-खो
२०१०-११  : सुबोध अनंत डंके, जलतरण
अशोक गुंजाळ, स्केटिंग
नरेंद्र कुंदर, खो-खो
 २०११-१२  : वर्षां म. उपाध्ये, जिम्नॅस्टिक
काकासाहेब किसन पवार, कुस्ती.
 राजीव प्र. मराठे, खो-खो.

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार
२००९-१० कविता माणिकराव निंबाळकर (नावंदे), पुणे.
२०१०-११ मधु विरेंद्र भांडारकर, मुंबई.
२०११-१२ सिमरत सतीश गायकवाड, ठाणे.
२०११-१२ कल्पना तेंडुलकर, सिंधुदुर्ग, (संघटक/कार्यकर्ती प्रवर्गातून) (या प्रवर्गामधून सन २००९-१० व सन २०१०-११ या वर्षांकरिता कोणीही पात्र उमेदवार आढळले नाहीत.)
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)- सन २००९-१०
आटय़ापाटय़ा : महिला- -, पुरुष- अलोक चंद्रशेखर पांडे.
तलवारबाजी :  महिला-स्नेहा पुंजाराम ढेपे, पुरुष- अजिंक्य अशोक दुधारे.
जिम्नॅस्टिक्स : महिला- पूजा श्रीनिवास सुर्वे, पुरुष- संदेश ग्यानिराम अतकरी.
जिम्नॅस्टिक्स : महिला- वंदिता नीलेश रावल, पुरुष- -.
हॅण्डबॉल : महिला- गायत्री ज्ञानेश्वर कांबळे, पुरुष- -.
ज्युदो: महिला- सुरेखा भानुदास शिरसाठ आव्हाड, पुरुष- -.
खो-खो: महिला- सुजाता किशनराव शानमे, पुरुष- शंतनु श्रीरंग इनामदार.
कबड्डी: महिला- संगीता केशवराव देशमुख, पुरुष- -.
मल्लखांब: महिला- श्रेयसी विनय मनोहर, पुरुष- विक्रांत मुरलीधर दाभाडे.
पॉवरलिफ्टिंग: महिला- -, पुरुष- संजय प्रतापराव सरदेसाई.
रोईंग : महिला- वैशाली पांडुरंग तांबे, पुरुष- -.
शूटिंग : महिला- तेजस्विनी मनोज मुळे, पुरुष- -.
जलतरण : महिला- जलजा अनिल शिरोळे, पुरुष- -.
तायक्वांदो : महिला- पूजा दत्तात्रय भालेकर, पुरुष- -.
 वेटलिफ्टिंग : महिला- -, पुरुष- मयूर किरण सिंहासने.
कुस्ती : महिला- -, पुरुष- ज्ञानेश्वर व्यंकट गोचडे.
स्केटिंग : महिला- -, पुरुष- निखिलेश निरंजन ताभाणे.

(सन २०१०-११)
पॉवरलिफ्टिंग :  महिला- जळगावकर दीपाली राजेंद्र, पुरुष- -.
मल्लखांब : महिला- साकोरे आरती अप्पाजी, पुरुष- अमराळे राजेश बबन.
 जिम्नॅस्टिक्स : महिला- सदिच्छा कुलकर्णी (थेट पुरस्कार), ज्योती शिंदे, पुरुष- मोहन बामणे.
तायक्वांदो : महिला- पूर्वा दीक्षित (थेट पुरस्कार), वर्षां लांडगे, पुरुष.
ज्युदो : महिला- किरण पेठे, पुरुष- तुषार माळोदे.
 रोईंग : महिला- -, पुरुष- अमर पाटील.
 तलवारबाजी : महिला- -, पुरुष- -.
शूटिंग : महिला- आयोनिका पॉल, पुरुष- मिर्झा शहजाद इशरत.
कबड्डी : महिला- स्नेहल संपत साळुंखे, पुरुष- जितेश शरद जोशी.
खो-खो : महिला- रोहिणी चिंतामणी आवारे, पुरुष- -.
आटय़ापाटय़ा : महिला- स्वाती विजय नंदागवळी, पुरुष- भूषण अशोक गोमासे.
खेळ : कुस्ती, महिला- -, पुरुष- उमेश हणमंत सुळ.
जलतरण : महिला- ज्योत्स्ना राजेंद्र पानसरे, पुरुष- अजय निशिकांत मोघे.
अॅथलेटिक्स : महिला- -, पुरुष- कृष्णकुमार सतीश राणे.
वुशू : महिला- शांती सोमनाथ राठोड, पुरुष- संदीप संभाजी शेलार.
हॅण्डबॉल : महिला- कीर्ती अनिल मुदलियार, पुरुष- -.
खेळ : टेबल टेनिस, महिला- आश्लेषा बोडस, पुरुष- -.
हॉकी : महिला- -, पुरुष- धनंजय महाडिक (थेट पुरस्कार).
याटिंग : महिला- -, पुरुष- कमांडर अतुल सिन्हा (थेट पुरस्कार), तृणाल हेलेगांवकर (थेट पुरस्कार).

(सन २०११-१२)
आर्चरी : महिला- जयलक्ष्मी त्रिनाद सारीकोडा, पुरुष- -.
आटय़ापाटय़ा : महिला- -,  पुरुष- पंकज रामदास पराते.
बॅडमिंटन : महिला- -,  पुरुष- इशांत सय्यद नक्वी.
बॉडीबिल्डिंग : महिला- -,  पुरुष- संग्राम बबर चौगुले.
कॅरम : महिला- -,  पुरुष- प्रकाश श्यामराव गायकवाड.
तलवारबाजी : महिला- स्नेहल गोविंद विधाते,  पुरुष- -.
वुशू : महिला- प्रतीक्षा संतोष शिंदे,  पुरुष- सोपान शंकर कटके.
कुस्ती : महिला- -,  पुरुष- शरद विठ्ठल पवार.
जिम्नॅस्टिक्स : महिला- कार्तिकी सुधीर शिरोडकर (थेट पुरस्कार), शिप्रा शिरीष जोशी (थेट पुरस्कार), जयश्री यशवंत प्रिंदावणेकर,  पुरुष- सिद्धार्थ महेंद्र कदम (थेट पुरस्कार), विनय गणेश सोनाली सावंत.
जलतरण : महिला- अनन्या तपनकुमार पाणिग्रही,  पुरुष- -.
 शूटिंग : महिला- नेहा मििलद साप्ते,  पुरुष- -.
 पॉवरलिफ्टिंग : महिला- स्नेहांकिता बाबासाहेब वरुटे,  पुरुष- -.
मल्लखांब : महिला- सायली अरुणकुमार धुरी,  पुरुष- शशिधर अनिरुद्ध म्हसकर.
खो-खो : महिला- कीर्ती रामचंद्र चव्हाण,  पुरुष- मनोज दिलीप वैद्य.
हॅण्डबॉल : महिला- कोमल नारायण वाघुळे,  पुरुष- -.
कबड्डी : महिला- सुवर्णा विलास बारटक्के,  पुरुष- -.
अॅथलेटिक्स : महिला- रेश्मा शंकरराव पाटील,  पुरुष- -.
एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)
(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)
पुरस्कारार्थीचे नाव
२००९-१० : पुरुष- बालगोपाल दिनेश वसंतलाल, महिला- मलिक दीपा.
२०१०-११ : पुरुष- -, महिला- कांचन योगेश चौधरी.
२०११-१२ : पुरुष- संदीप नारायण गवई, महिला- महानंदा महादेव तळवेकर.

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार
(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)
२००९-१० : स्वप्नाली यादव, मुंबई, खेळ- समुद्र/खाडी पोहणे.
२०१०-११ : संजय टकले, पुणे, खेळ- मोटोक्रॉस.
२०११-१२ : आप्पासाहेब भिमराज ढुस, अहमदनगर, खेळ- पॅराजम्पिंग.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते)
२००९-१०
सुरेश गजानन पाटील, ठाणे
राजीव ज्ञानेश्वर कुलकर्णी, पुणे
संजय लोखंडे, नागपूर
आनंद खरे, नाशिक

२०१०-११
प्रकाश पवार, ठाणे
संजय भोकरे, सांगली
दिलीप घोडके, पुणे
हनुमंत लुंगे, अमरावती</p>

२०११-१२
अरविंद ठाणेकर, ठाणे
अशोक मगर, उस्मानाबाग
शहाजी सूर्यवंशी, कोल्हापूर<br />मंगल पांडे, परभणी
सदानंद जाधव, अमरावती
बबन तायवाडे, नागपूर

Story img Loader