पाडळी स्थानकाजवळ गोरखपूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नाशिक मुंबई दरम्यान होणारी एक्स्प्रेस वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक गाड्या या नाशिक रेल्वे स्थानकात थांबून आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.
पहाटे पाचच्या सुमारास गोरखपूर एक्स्प्रेस पाडळी स्थानकाजवळ आल्यानंतर गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर मोठा परिणाम झाला. गोदावरी एक्स्प्रेस रद्द करावी लागली. तर राज्यराणी एक्स्प्रेस ही नाशिक स्थानकातच उभी आहे. पंचवटी एक्स्प्रेससह अनेक रेल्वे रखडल्या आहेत.
आणखी वाचा