‘व्हॉट्सअप’, फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवरून अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता आलोकनाथ, रजनीकांत यांचा ‘भाव’ कमी झाला आहे. त्यांची जागा आता आता झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान ऊर्फ ‘जान्हवी’ने घेतली आहे. या मालिकेत तिच्या तोंडी असलेल्या ‘काहीही हं श्री’ या वाक्यावरून वेगवेगळे विनोद तयार करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॉट्सअप’वर त्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.
कोणतीही बातमी किंवा घटना सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून सध्या ‘व्हॉट्सअप’चा विशेष बोलबाला आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार स्त्री-पुरुष, गृहिणी ते आबाल-वृद्धांपर्यंत भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअप’ प्रत्येकाच्या हातात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘व्हॉट्सअप’वर आलिया भट्ट ही ‘बकरा’ होती. तिच्यावर तयार केलेले अनेक विनोद वेगाने फिरत होते. ‘संता बंता’, ‘आलोकनाथ’, ‘रजनीकांत’ हे ठरलेले ‘गिऱ्हाईक’ होते आणि आहेतच. तसेच काही दिवस ‘होऊ दे खर्च’ यावरूनही विनोद, व्यंगचित्र ‘व्हॉट्सअप’ व ‘फेसबुक’वरून चालविले जात होते. सध्या ‘काहीही हं श्री’या वाक्याचा आधार घेऊन तयार केलेले वेगवेगळे विनोद एक नंबरवर आहेत.
‘होणार सून मी या घरची’या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजेच मालिकेतील ‘जान्हवी’ आपल्या नवऱ्याशी- ‘श्री’शी बोलताना लाडाने आणि हसून ‘काहीही हं श्री’ असे एक वाक्य हमखास म्हणते. तिचे हे वाक्य लोकप्रिय झाले आहे. मात्र आता याच वाक्याचा आधार घेऊन ‘व्हॉट्सअप’वर वेगवेगळे विनोद फिरत आहेत. काल फिरणारा विनोद हनुमान आणि श्रीकृष्णावरील होता. हनुमान श्रीकृष्णाला ‘मी एका हाताने पर्वत उचलला’असे सांगतात तेव्हा श्रीकृष्ण ‘मी करंगळीवर पर्वत उचलला’ असे उत्तर हनुमानांना देतात. त्यावर हनुमान ‘काहीही हं श्री’असे उत्तर देतात.
वानगी दाखल..
* श्रीकर परदेशी- मी ‘पीसीएमसी’मधील सर्व अनधिकृत बांधकामे पाडणार आहे.
लक्ष्मण जगताप- काहीही हं श्री.

* वरुण- आलिया आता लोकं तुझ्यावर जोक्स मारत नाहीत.
आलिया- का रे वरुण.
वरुण- श्री आणि जान्हवीने वाचवलं तुला.
आलिया- काहीही हं वरुण.

when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
“रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही”, उदय सामंतांकडून भूमिका स्पष्ट
kishori godbole and swapnil joshi
“त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर…”, अभिनेता स्वप्नील जोशीबरोबरच्या मैत्रीवर किशोरी गोडबोले म्हणाली, “कामाशिवाय फोन…”
actor suvrat joshi play role in vicky kaushal chhaava movie
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता ‘छावा’मध्ये झळकणार! विकी कौशलबद्दल म्हणाला, “सेटवर प्रचंड मेहनत…”

* श्रीदेवी- मुझसे सुंदर औरत इस दुनिया में नही है.
बोनी कपूर- काहीही हं श्री.

* श्रीदेवी- काटे नही कटते दिन ये रात, कहिनी थी जो तुमसे दिल की बात लो आज मैं कहेती हूं, आय लव्ह यू.
अनिल कपूर- काहीही हं श्री.

* श्रीनिवासन- माझ्यामुळे ‘बीसीसीआय’ श्रीमंत आहे.
शरद पवार- काहीही हं श्री.

* श्रीखंड- सगळ्यांचा आवडता मीच
आम्रखंड, गुलाबजाम, बासुंदी- काहीही हं श्री.

* श्रीशांत (इन कोर्ट)- आय अ‍ॅम नॉट गिल्टी, आय वॉज नॉट इन्व्हॉल्ड इन मॅच फिक्सिंग.
जज्ज- काहीही हं श्री.

Story img Loader