रसिकांना एकदा चित्रपट आवडला की, त्या चित्रपटाच्या यशाचा मुसळधार पाऊस कडाक्याची थंडी व प्रचंड उष्णता अशा गोष्टी रोखू शकत नाहीत याचा प्रत्यय यावर्षीच्या पावसाळ्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी दिला आहे. दीड-दोन महिने सातत्याने पाऊस पडत असूनही ‘रांझणा’ व ‘भाग मिल्खा भाग’ यांची उत्तम तर रमैय्या वस्तावय्या व लुटेरान साधारण स्वरुपाचे यश प्राप्त केले.
तर दरवर्षी पावसापासून पळ काढणाऱया मराठी चित्रपटांना यंदा मात्र यशाचा गारवा लाभला आहे. झपाटलेला-२ व दुनियादारी यांनी उत्तम यश प्राप्त केले. तर, खो-खोन साधारण स्वरूपाचे यश मिळविले. या यशाने सप्टेंबरच्या मध्यापर्यंत थांबणाऱया पावसाळ्यापर्यंत अधिकच उत्साहाने मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हावेत.
यापूर्वी जंजीर, बॉबी, शोले, सागर, राम तेरी गंगा मैली, १९४२ अ लव्ह स्टोरी, मोहरा, हम आपके है कौन, रंगीला, कोई..मिल गया, जाने तू या जाने ना हे चित्रपट अशाच पावसाळ्यात प्रदर्शित होऊन यशस्वी ठरले. शाळा-कॉलेजेस् सुरू झाली की उत्साही वातावरण, पावसाळ्याचे धुंद वातावरण व विविध सणांच्या रजा या साऱयामुळे ‘चित्रपट पहावयास वाटणे’ असे वातावरण निर्माण होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2013 रोजी प्रकाशित
पावसाळ्यात चित्रपट यशस्वी होण्याचे सातत्य कायम
रसिकांना एकदा चित्रपट आवडला की, त्या चित्रपटाच्या यशाचा मुसळधार पाऊस कडाक्याची थंडी व प्रचंड उष्णता अशा गोष्टी रोखू शकत नाहीत याचा प्रत्यय यावर्षीच्या पावसाळ्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी दिला आहे.

First published on: 23-07-2013 at 11:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movies are becomeing hit in rainy season