गेले काही दिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी फार चर्चेत आहे. दिसायला देखणी असलेली सारा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चेने माध्यमांमध्ये जोर धरला होता. मात्र, आपली मुलगी सध्या तिच्या शैक्षणिक जीवनाचा आनंद घेत असून, ती चित्रपटात काम करणार असल्याच्या अफवांनी त्रस्त झाली असल्याचे, सचिनने ट्विटरद्वारे म्हटले आहे.

१८ वर्षीय सारा तेंडुलकरचा शाहिद कपूरसोबत चित्रपट येणार असल्याची बातमी गेले काही दिवस प्रसार माध्यमांमध्ये फिरत होती. सचिन तेंडुलकरने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा पत्रकारांनी सचिनला साराच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारला होता. मात्र सचिनने त्यावेळी स्पष्ट बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे सारा ही अभिनय क्षेत्राकडे वळणार असल्याचा अनेकांचा समज झाला होता. पण, सचिनच्या या ट्विटनंतर सगळ्यांनाच उत्तर मिळाले आहे.

Story img Loader