‘बिग बॉस’ या रिअॅलिटी कार्यक्रमाचा सातवा सिझन लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सलमान खान दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ चित्रपटाप्रमाणे बॉलिवूड अभिनेता सलमान खान या प्रोमोमध्येही दुहेरी भूमिकेत दिसेल. एक सदगृहस्थ तर दुसरा टपोरी या भूमिकांमध्ये सलमानवर कार्यक्रमाचा प्रोमो चित्रित करण्यात येईल. प्रोमोचे चित्रिकरण लवकरच सुरु होणार आहे.
‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनपासून सलमान या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करत आहे. हा रिअॅलिटी शो सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader