मराठी सिनेसृष्टीत अनेक सेलिब्रेटिंच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकले आहेत. अशा सेलिब्रेटी मैत्रीची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मराठी सिनेसृष्टीत अशी मैत्री आपल्याला “बंध नायलॉनचे” या सिनेमाच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. संगीतकार अमितराज आणि अवधूत गुप्ते अगदी चांगले मित्र आहेत. आणि याचं मैत्रीखातर अवधूत यांनी अमितराज संगीत देत असलेल्या बंध नायलॉनचे या सिनेमासाठी एक गाणं गायलं आहे. होंडा स्टुडिओ येथे नुकतंच या सिनेमातील “कुणीतरी” हे गाणं अवधूतच्या सुरेल आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.
सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे. टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा सिनेमा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमितराज आणि अवधूत हे दोघेही चांगले मित्र असले तरी या निमित्ताने दोघांनीही पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
अवधुत गुप्ते यांनी आतापर्यंत अनेक गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध केले आहे. त्यांच्या याचं आवाजाची जादू आपल्याला “कुणीतरी” या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे. “कुणीतरी” हे गाणं बंध नायलॉनचे या सिनेमातील एका परिस्थितीला अनुसरून असणारे आहे. अमितराज यांच्या संगीताची जादू आपण अनेक चित्रपटांमधून पाहतोच. अमितराज यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी सिनेसृष्टीपासून केली. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी विचारले असता, ” अमित राज हा गेल्या २० वर्षांपासूनचा मित्र आहे. आमचं क्षेत्र संगीतच होतं, मात्र वाटा वेगळ्या होत्या. मी मराठीत काम करीत होतो, तर अमित हिंदीत करीत होता. त्याच्या संगीतामध्ये मला बॉलीवूड स्टाईल जाणवते. त्याच्या सोबत हे गाणं करताना खूप चांगल वाटलं. एका चांगल्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतोय याचाही मला खूप आनंद आहे.”, तर अवधूतविषयी अमितराज यांना विचारले असता, “मी आणि अवधूत खूप चांगले मित्र असून त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायक आहे. जेव्हा गाणं लिहून पूर्ण झालं त्यावेळी हे गाणं अवधूतकडूनचं गाऊन घ्यायचं, असं आमचं ठरलं. आधी मला थोडं टेन्शन आलं होतं. मराठीतला नावाजलेला संगीतकार, एक चांगला दिग्दर्शक मी कंपोज केलेलं गाणं गाणार आहे. पण गाणं गातेवेळी अवधूत मला फक्त एक गायकचं दिसला. अगदी स्मूथली त्याने हे गाणं गायलं आहे”
जतिन वागळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि संवाद साधण्यावर विश्वास ठेवणारी पिढी यांची सुरेख गुंफण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिजी नायर आणि सुनील चंद्रिका नायर यांच्या झिरो हिट्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा सिनेमा असून महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे , प्रांजल परब हे कलाकार आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून सिनेमाची गीते लिहिली आहेत. मानवी नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जब मिल बैठे दो यार’
"कुणीतरी" हे गाणं बंध नायलॉनचे या सिनेमातील एका परिस्थितीला अनुसरून असणारे आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
आणखी वाचा
First published on: 05-12-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitraj and avdhoot gupte come together for bandh nylonche