भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड रचणारा ‘बाहुबली द-बिगिनिंग‘ हा चित्रपट ६३व्या राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. नवी दिल्लीत सोमवारी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर कंगना राणावत हिला ‘तनू वेडस् मनू -रिटर्न’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित करण्यात आला. याशिवाय, ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘रिंगण‘ चित्रपटाची निवड झाली. याशिवाय, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गायनासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून निवडण्यात आले.
६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट चित्रपट- बाहुबली -द बिगिनिंग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत ( तनू वेडस मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी (बाजीराव-मस्तानी)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- रिंगण
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- रेमो डिसोझा ( दिवानी मस्तानी- बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट – हरिष भीमानी (मला लाज वाटते)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध (मराठी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद – पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन – बाजीराव मस्तानी