बायोपिक चित्रपटांची लाट हिंदीबरोबरच मराठीतही रूजली असून वास्तवातील तसेच इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्वांचे जीवन आणि कार्य आजच्या प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्याचे आव्हान पेलून दिग्दर्शक चित्रपट निर्मिती करीत आहेत. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटामार्फत दिग्दर्शकाने शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
चरित्रात्मक चित्रपट म्हटला की अपेक्षित असलेले व्यक्तिमत्वाला ‘हिरो’ बनविण्याचा प्रयत्न स्वाभाविक असला तरी लोकमान्य टिळकांचा निव्वळ चरित्रात्मक जीवनपट न उलगडता त्यांचे विचार आजच्या तरुणाईला पटवून देण्याचाही मर्यादित पण यशस्वी प्रयत्न चित्रपट करतो.
‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही’ हे टिळकांचे बालपणीचे उद्गार आणि ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ उद्गार सर्वच मराठी भाषकांना चांगलेच माहीत आहेत. परंतु, टिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वाद तसेच टिळक-गांधीजी भेट याविषयी आजच्या प्रेक्षकांना खूप खोलवर फारसे काही माहिती नाही. दिग्दर्शकाने हे दोन्ही पैलू चित्रपटात सोप्या पद्धतीने उलगडून दाखविले आहेत. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी केली असे महत्त्वाचे पैलू अतिशय प्रभावी पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत.
परंतु, टिळक-आगरकर यांची मैत्री, नंतर झालेले त्यांचे मतभेद या प्रसंगांचे सविस्तर चित्रण केल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले ते ठसविण्यात चित्रपट यशस्वी ठरत नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा महत्त्वाचा ग्रंथ असेल किंवा रॅण्डच्या खुनामागील कटातील सहभाग असेल हे सारे प्रसंग दाखवूनही टिळक देशपातळीवर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते कसे बनले ते दाखविणेही आवश्यक होते. केवळ स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि टिळक यांच्यातील भेटींच्या प्रसंगाचे चित्रण अगदी सर्रकन निघून जातात. तरीसुद्धा टिळकांचे गणिताचे प्रेम, त्यांना विविध विषयांची आवड होती हे पैलु मात्र दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
टिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वादाचे प्रसंग दाखविल्यानंतर अखंड चित्रपटात आगरकरांची व्यक्तिरेखा कुठेच दिसत नाही. त्याचबरोबर दाजी म्हणून टिळक ज्यांना नेहमी पुकारत आणि हे दाजी टिळकांच्या कायम बरोबर असत ते नेमके कोण हे चित्रपट पाहताना प्रेक्षकाला उलगडत नाही.
आजच्या काळातील मकरंद या पत्रकाराला टिळकांचा मूळ आवाज ऐकण्याची संधी मिळते आणि नंतर टिळकांविषयीचे वाचन, मनन तो करतो आणि टिळकांच्या विचारांशी आजच्या काळातील शेतकरी आत्महत्या व तत्सम प्रश्नांशी तुलना मकरंद करतो आणि आजच्या काळातही टिळकांचे विचार महत्त्वाचे ठरतात हे त्याला पटते. मकरंद या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून पटकथा लेखकांनी चित्रपट उलगडत नेला असून मकरंदच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकासमोर टिळकांचे विचार, व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचे योगदान याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना अर्थातच फ्लॅशबॅक तंत्राचा वापर चपखलपणे केला आहे.
लोकमान्यांचे व्यक्तिमत्व किती उत्तुंग होते हे ठसविण्यात चित्रपट मर्यादित अर्थाने नक्कीच यशस्वी झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांचा अभिनय हेच आहे.
बालगंधर्व यांची भूमिका पडद्यावर जिवंत करण्यात यशस्वी ठरल्यानंतर लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याचे आव्हान सुबोध भावेने उत्तम रितीने पेलले आहे. त्याचबरोबर आजच्या काळात टिळकांचे विचार किती आवश्यक आहेत, आज स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटली असली तरी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असो वा अन्य अनेक प्रश्न असोत मकरंद कसा गोंधळून गेला आहे हे दाखविणारी अवघड भूमिका चिन्मय मांडलेकरने उत्तम साकारली आहे.
वेशभूषा, संगीत, पाश्र्वसंगीत, अभिनय या विभागांची उत्तम साथ दिग्दर्शकाला मिळाली आहे.

एस्सेल व्हिजन प्रस्तुत लोकमान्य एक युगपुरुष
निर्माती – नीना राऊत
दिग्दर्शक – ओम राऊत
छायालेखक – प्रसाद भेंडे
पटकथा – आम राऊत, कौस्तुभ सावरकर
संवाद – कौस्तुभ सावरकर, ओम राऊत
संगीत – अजित-समीर
पाश्र्वसंगीत – समीर म्हात्रे
संकलन – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
वेशभूषा – महेश शेरला
कला दिग्दर्शक – संतोष फुटाणे
रंगभूषा – विक्रम गायकवाड
कलावंत – सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, अंगद म्हसकर, प्रिया बापट, श्वेता भेंडे, दीपेश शहा, प्रशांत उथळे, विक्रम गायकवाड व अन्य. 

lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”
Devendra Fadnavis On Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Scuffle : मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण, मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; म्हणाले, “कधी-कधी काही नमूने…”
Neelam Gorhe refused permission to Ambadas Danve to speak after fight in legislature over Babasaheb ambedkar insult by amit shah
बाबासाहेबांच्या अवमानावरून विधिमंडळात रण पेटले…निलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवेंना बोलण्याची परवानगी नाकारली…
Parbhani Incident, Buldhana District,
परभणीतील घटनेचे बुलढाणा जिल्ह्यात पडसाद, मलकापूर पांग्रा कडकडीत बंद
ajit pawar statement regarding the future of ladki bahin yojana
नागपूर : अजित पवार म्हणाले, ‘काही खर्च टाळता येत नाही’ ; ‘लाडकी बहिण’च्या भवितव्याबाबत…
Story img Loader