‘दोन्ही घरचा पाहुणा’ (१९७२) या पहिल्या चित्रपटापासूनची अशोक सराफची अभिनयाची वाटचाल बहुरुपी आहे. हे पुन्हा वेगळे सांगायची काहीही गरज नाही. कारकिर्दीच्या तब्बल बेचाळीस वर्षाच्या अष्टपैलू वाटचालीनंतरही या संवेदनशील कलाकाराची आव्हानात्मक भूमिका साकारायची, त्यासाठी मेहनत घेण्याची भूक अद्याप संपलेली नाही. नुकत्याच एका भेटीत अशेक सराफ सांगत होता, अरे, आज मराठीतील वर्षभरात शे-सवावाशे चित्रपट निर्माण होत असले, तरी माझ्याकडे मात्र एकही मराठी चित्रपट नाही. याचा अर्थ मझ्याकडे ऑफर्स येत नाहीत असा नव्हे, तर काही वेगळे करावे, आव्हानात्मक ठरावे असे त्यात काहीही नाही. पैशासाठी म्हणून कधी तरी एखादा चित्रपट सगळेच करतात. पण आता मला कामाचे समाधान हवे आहे. त्यासाठी मी आता नवे नाटक स्वीकारले आहे. त्याबाबतचे तपशील इतक्यातच देणे योग्य वाटत नाही. पण नाटकातून भूमिका साकारल्याचे समाधान खूपच मोठे असते, अशोक सराफ याने सांगितले. अशोक सराफची अभिनय क्षमता आणि सामर्थ्य पाहता त्याच्याकडे बरेच मराठी चित्रपट हवेत ना?…
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2014 रोजी प्रकाशित
अशोक सराफ कसदार भूमिकेच्या प्रतिक्षेत
'दोन्ही घरचा पाहुणा' (१९७२) या पहिल्या चित्रपटापासूनची अशोक सराफची अभिनयाची वाटचाल बहुरुपी आहे.

First published on: 16-09-2014 at 03:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ashok saraf