मराठी सिनेसृष्टी हाताळल्या जाणाऱ्या वेगळ्या विषयांसाठी जाणली जाते. असाच एक वेगळा विषय मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वॉन्टेड आणि अनवॉन्टेडची निवड आपल्याला नेहमीच करावी लागते. हाच पाया असणारी एक आजच्या पिढीची कथा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटातून लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. उर्वी एंटरप्रायजेस निर्मित या चित्रपटाची कथा प्रकाश गावडे यांची असून दिग्दर्शक दिनेश अनंत आणि प्रकाश गावडे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक दिनेश अनंत दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. तर मितांग भूपेंद्र रावल यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे.
दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी यापूर्वी बऱ्याच चित्रपटांसाठी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले असून…त्यात डोंबिवली फास्ट आणि श्वास या चित्रपटांची नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील. दिनेश अनंत दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात मिस्टरांच्या भूमिकेत क्राइम पेट्रोल फेम राजेंद्र शिसतकर असून मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकर मिसेसच्या भूमिकेत दिसणार आहे. उर्वी एंटरप्रायजेस निर्मित मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड हा सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader