बॉलिवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी त्यांच्या बहिण, भाऊ, आई – वडील, मुलगी या सर्व नात्यांची नेहमीच चर्चा होत असते. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत बहिणींच्या नात्यांची कमतरता नेहमीच जाणवली आहे. पण, आज आपण अशा मराठी सेलिब्रिटी बहिणींवर नजर टाकणार आहोत ज्या हुबेहुब त्यांच्या बहिणीसारख्या दिसतात. या अभिनेत्रींच्या बहिणींवर नजर टाकल्यास जणू आपल्यासमोर त्यांच्या जुळ्या बहिणीच असल्याचा भास होतो. एखाद्या अभिनेत्रीऐवजी तिच्या बहिणीला उभं केलं तरी काही क्षणासाठी आपण त्या अभिनेत्रीलाच पाहत आहोत की काय असा भास झाल्यावाचून राहणार नाही.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यकमामधून सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिला तेजल ही बहिण आहे. श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते.

shreya-bugde-sister-tejal-04
श्रेया बुगडे बहिण तेजल

‘नटसम्राट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘पुणे व्हाया बिहार’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला गौतमी ही लहान बहिण आहे. गौतमी हीसुद्धा एक अभिनेत्री आहे. तिने नाटकांमध्ये काम केले असून ती उत्तम गायिकासुद्धा आहे.

mrunmayee-deshpande-sister-gautami-07
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे

पाठक बाई म्हणून प्रसिद्धीस आलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधरला अनुजा ही मोठी बहिण आहे. आपल्या बहिणीसोबतचे बरेचसे फोटो अक्षया इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

akshaya-deodhar-sister-anuja-05
अक्षया देवधर आणि अनुजा देवधर

आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बापटला श्वेता ही बहिण आहे.

priya-bapat-sister-shweta-03
प्रिया बापट आणि श्वेता बापट

‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम स्पृहा जोशीला क्षिप्रा ही बहिण आहे.

spruha-joshi-sister-kshipra-joshi-01
स्पृहा जोशी आणि क्षिप्रा जोशी

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंतला एक बहिण आणि भाऊ आहे.

pooja-sawant-sister-02
पूजा सावंत आणि तिची बहिण