सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो अस म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं. मराठी सिनेमा बदलतो आहे, अनेक चांगले विषय मराठीसृष्टीत हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन येतोय शासन हा सिनेमा. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून मराठी सिनेसृष्टीला दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करणारे गजेंद्र अहिरे यांच्या शासन सिनेमात आपल्यलाला दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.शासन सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत.
राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो याचे चित्रिकरण या सिनेमात करण्यात आले आहे.
शेखर पाठक हे या सिनेमाचे निर्माते तसेच प्रस्तुतकर्ता असून श्रेया फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ. श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.मराठीतले ख्यातनाम कवी आणि साहित्यिक विं दा करंदीकर यांची माझ्या मना बन दगड या कवितेला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिला असून जसराज जोशी याने हे गाणं गायल आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र भिडे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले असून जयदीप वैद्य यांनी देखील गाण गायलं आहे. एकंदरच दिग्गज कलाकारांनी नटलेला असा शासन हा सिनेमा २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Story img Loader