अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात मनमीत पेम याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होता. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले.
VIDEO: श्रीदेवी, शिल्पाने मिळून उडवली करणची खिल्ली
ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये असणाऱ्या या पोस्टरमध्ये सोनाली आणि रवीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. तर मागे उभे असलेले सचिन मात्र थोडेसे हसताना दिसतायेत. मनमीतचीही या पोस्टरमध्ये झलक पाहावयास मिळते. एका महत्त्वपूर्ण विषयावर हा सिनेमा भाष्य करतोय असं प्रथमदर्शनी या सिनेमाच्या पोस्टरकडे पाहून दिसतं. पण सिनेमाची कथा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पोस्टरवरील मनमीतची झलक पाहतात तो यात गतीमंद मुलाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/BVL9OWml7IA/
प्रसादने याआधी कच्चा लिंबू सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हाही इन्स्टाग्रामवरुन सिनेमाच्या नावाचा एक फोटो शेअर केला होता. या सिनेमात फक्त कलाकारच दिग्गज आहेत असं नाही तर निर्माते आणि लेखकांची फौजही भन्नाट आहे.
‘होणार सून मी ह्या घरची’ फेम मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘टिपी’ आणि ‘बीपी’ फेम दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमातून अभिनयात पदार्पण करत आहे.
https://www.instagram.com/p/BD66bs3jd8W/
अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित
प्रसादने याआधी पुष्कर श्रोतीसोबत ‘हाय काय नाय काय’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. पण आता त्याच्या एकट्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा त्याचा पहिला सिनेमा आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.