बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं. रात्री झोपण्यापूर्वी त्याने काही गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर तो सकाळी झोपेतून उठलाच नाही. सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात राहिला नाही, हे स्विकारणं त्याच्या फॅन्सना अवघड जात आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहावर शवविच्छेनाची प्रक्रिया असून थोड्याच वेळात मेडीकल रिपोर्ट देखील समोर येणार आहेत. अशात सिद्धार्थ् शुक्लाचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. यामध्ये सिद्धार्थ शुक्लाने मृत्यूच्या १२ तासांपूर्वी एका अभिनेत्याला कॉल केल्याचं आढळून आलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण कुंद्रा हे दोघेही खूपच जवळचे मित्र होते. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने अभिनेता करण कुंद्राला देखील मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच सुरूवातीला त्याला विश्वास बसला नाही. मात्र याबाबत खात्री झाल्यानंतर त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्याने लिहिलं की, “धक्कादायक, काल रात्रीच माझं सिद्धार्थशी बोलणं झालं होतं. आम्ही दोघंही इंडस्ट्रीत खूपच चांगलं काम करत होतो…यावर आमचं बोलणं सुद्धा झालं. यावर मला विश्वासच बसत नाही…मित्रा, तू खूप लवकर सोडून गेलास…तू कायम आठवणीत राहशील…कायम आनंदी रहा…तू सोडून गेल्याचं खूप दुःख वाटतंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

आणखी वाचा: Siddharth Shukla Death: ‘बालिका वधु’मधील जोडीची कायमची एक्झिट; आनंदीची आत्महत्या तर ‘शिव’ला हार्टअटॅक

सिद्धार्थ शुक्ला याच्या मृतदेहावर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीन ते साडे तीनच्या सुमारास सिद्धार्थच्या तब्येत बिघडली होती. त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि छातीत दुखू लागलं होतं. त्याने त्याच्या आईला सुद्धा हे सांगितलं होतं. सिद्धार्थ शुक्लाच्या आईने त्याला पिण्यासाठी पाणी देखील दिलं होतं आणि नंतर तो झोपण्यासाठी गेला. पण त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. ‘बिग बॉस’चा होस्ट अभिनेता सलमान खानने सुद्धा त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सलमान खानने ट्विट शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली. “तू खूप लवकर सोडून गेलास सिद्धार्थ….तू कायम आठवणीत राहशील…कुटूंबीयांसाठी संवेदना” असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलंय.

आणखी वाचा: काल रात्री मित्राच्या घरी गेला होता सिद्धार्थ शुक्ला; रूग्णालयात नेण्यापूर्वीच झालं होतं निधन

सिद्धार्थ शुक्लाच्या पीआर टीमने देखील एक स्पष्टीकरण जारी केलंय. यात त्यांनी लिहिलंय, “सिद्धार्थच्या जाण्याने आम्हाला सुद्धा तितकाच धक्का बसलाय जितका तुम्हा सर्वांना… आमच्या या कठिण काळात आम्हाला साथ द्या अशी तुम्हा सर्वांना आमची एक विनंती आहे. सिद्धार्थच्या पीआर टीमकडून सर्व माध्यमांकडू आमची एक विनम्रतेने एक विनंती आहे की सिद्धार्थच्या कुटुबीयंना आणि परिजनांना त्यांची एक स्पेस द्या. आपण सर्वच जण दुःखात आहोत. आपल्या सर्वांना माहितेय सिद्धार्थ त्याचं खाजगी आयुष्य हे स्वतःपर्यंत मर्यादीतच ठेवत आला आहे. त्यामुळे कृपया त्याच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा.”

मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर होते. त्याचं निधन झाल्यानंतर आई रीता शुक्ला यांनीच त्याचा सांभाळ केला होता. त्या गृहिणी आहेत. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत.