बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि काजोल यांनी साकारलेली राहुल आणि अंजलीची प्रेमकथा तर साऱ्यांनाच माहित आहे. या प्रेम कथेचे आजही अनेकजण दिवाने आहेत. पण त्या सिनेमात त्यांची लग्नापर्यंतचीच प्रेम कथा दाखवण्यात आली होती. लग्न झाल्यानंतर त्यांचे काय होते हे सांगणारी कथा आता मराठीत येत आहे. ‘तुला कळणार नाही’ असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले.

पहिली दोन वर्षांत आमच्या हनीमूनमध्ये खूप अडथळे आले- शाहरुख खान

एका ऑडिओमधून राहुल आणि अंजली या पात्रांची ओळख या मोशन पोस्टरमध्ये होते. मराठीतील या राहुल अंजलीच्या भूमिकेत कोण आहे, हे सध्या गुपितच ठेवण्यात आले असले तरी, सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित केलेल्या ‘तुला कळणार नाही’ या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचे ते आवाज असल्याचे स्पष्ट जाणवते. सोनाली आणि सुबोध या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना तिने ‘लग्नाची बेडी वजा प्रेमाची गोडी… कशी तरेल ह्यांच्या संसाराची होडी?’ असे अनोखे कॅप्शनही दिले.

पडद्यावर प्रेमकथा साकारण्यात हातखंडा असणारी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमातून स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://www.instagram.com/p/BWr7rE-lRQv/

विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक सिनेमांची निर्मिती आणि वितरण करणारे जीसिम्ससोबत स्वप्नील जोशी निर्माता म्हणून यापुढील प्रवासात कायम राहणार आहे. तसेच निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

Story img Loader