आपल्या सिनेमातून प्रेमाची नवी परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी लवकरच त्यांच्या आगामी ‘फुगे’ या मराठी सिनेमातून प्रेमाची हटके बॅकस्टोरी लोकांसमोर घेऊन येत आहेत. प्रेमाच्या या हटके बॅकस्टोरीत स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे हे मराठी सिनेसृष्टीतली तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहेत. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सोशल साइटवर नुकतेच टीजर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सिनेमाच्या ‘फुगे’ या हटके नावाला साजेशा अशा या टीजर पोस्टरला सोशल साइटवर प्रसिद्धी मिळत आहे. हे पोस्टर पाहताचक्षणी डोळ्यात भरते.

सुंदर समुद्र किनारा असलेल्या या पोस्टरवर रंगीबेरंगी फुगे पाहायला मिळत असून, हे फुगे पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करतात. शिवाय या टीजर पोस्टरमधील आणखीन एक गंमत म्हणजे सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आडनावात स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असा घोळ झालेला दिसून येत आहे. मुळात हा घोळ नसून स्वप्नील आणि सुबोधच्या आडनावांची ही अदलाबदल जाणूनबुजून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द स्वप्नील आणि सुबोधनेदेखील त्याला दुजोरा देत आपापल्या ट्विटर अकाऊंटचे स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असे नामकरण करून टाकले आहे. त्यामुळे ‘फुगे’ हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

रंगीबेरंगी फुग्यांनी भरलेले हे पोस्टर पाहताना ‘फुगे’ हा सिनेमा एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे समजून येते. मुळात मन प्रसन्न करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हाताळण्यास हलके असणारे फुगे लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकांना लुभावतात. त्यामुळे हा सिनेमा ‘फुगे’ या नावाला समर्पक असे प्रेक्षकांचे मनोरंजन करेल ही खात्री आहे.

मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे ‘फुगे’ या सिनेमाला प्रदर्शनाआधीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारी एस.टी.व्ही.नेटवर्क या निर्मिती संस्थेअंतर्गत प्रदर्शित होणारा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी देखील एस टीव्ही नेटवर्कने निर्मित केलेल्या विविध चित्रपटातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, तसेच मराठी सिनेवर्तुळात वर्चस्व गाजवणारे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बऱ्हाण यांच्या जीसिम्स स्टुडियोजचा देखील यात मोठा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देणारे जीसिम्स ‘फुगे’ या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभे ठाकत आहे. शिवाय स्वप्नील आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या सिनेमाद्वारे जुळून आला असल्यामुळे हा सिनेमा लोकांसाठी दुहेरी मेजवानी ठरणार आहे.

Story img Loader