एक होता वाल्या’ हा चित्रपट आदिवासी कोळी आणि तत्सम जमातींवर होत असलेल्या सामाजिक खच्चीकरणामुळे निर्माण झालेल्या जातिविषयक संर्घषावर आधारित ‘आहे. स्वातंत्र्याला पासष्ट वर्षे होऊनही काही आदिवासी जमातीना न्याय मिळाला नाही. आदिवासी कोळी आणि तत्सम जमातींनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेल्या संघर्षांचे खरेखुरे प्रतिबिंब म्हणजे ‘एक होता वाल्या’.
वास्तववादी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाला जयपूर इंटरनॅशल फिल्म फेस्टीवल २०१६ मध्ये बेस्ट पॉलिटिकल फिल्म या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा चित्रपट शरदचंद्र जाधव यानी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील वाल्याची भूमिका दिग्दर्शिक शरदचंद्र जाधव यांनी स्वत: साकारली आहे.
आणखी वाचा