बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आईचे काल निधन झाले. सुधीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेक सांत्वन करत आहेत. या यादीत बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचाही समावेश आहे. अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासगळ्यात अनिल ट्रोलिंगचा शिकार झाले आहेत.

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

अनिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सुधीर मिश्रा यांचे ट्वीट रि-ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये अनिल यांनी ‘सुधीर मी दु:खाच्या क्षणी तुझ्यासोबत आहे’, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. पण यासोबत त्यांनी आनंदी इमोजी वापरलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनिल यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे.

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट

अनिल कपूरचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘शोक करताना कोण इतक आनंदी होतं?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अनिल तुम्ही हे काय केलं’, तुमच्या ट्वीटवरून असं वाटतयं की ‘तुम्हाला खूप आनंद झाला आहे. हे ट्वीट एडिट किंवा मग डीलीट करा.’ तिसरा नेटकरी म्हणाला, एकदा इमोजी तर बघ. आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘असा वाईट शोक मेसेज, लहान मुलगी आहे काय?’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अनिल यांना ट्रोल केले आहे.

anil kapoor troll, sudhir mishra mom died,

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?

आईच्या निधनाची माहिती देताना सुधीरने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या आईचे तासाभरापूर्वी निधन झाले, ती आम्हाला कायमची सोडून गेली. आईच्या मृत्यूच्या वेळी मी आणि माझी बहीण तिच्यासोबत होतो. मी आता अधिकृतपणे अनाथ आहे.’

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या वडिलांमुळे मोहम्मद रफी गाऊ लागले मराठी भक्तीगीते

अनिल कपूर ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader