९५व्या ‘अकादमी पुरस्कारां’च्या २३ विभागांची नामांकने मंगळवारी जाहीर झाली. सर्वोत्तम मूळ गीत प्रकारामध्ये ‘नाटू नाटू’ला नामांकन मिळालं आहे. तर, भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आलेला ‘छेल्लो शो’ मात्र लघुयादीतून बाद झाला. ‘गोल्डन ग्लोब’ आणि ‘क्रिटिक चॉईस’ हे दोन महत्त्वाचे अमेरिकी अवॉर्ड्स पटकावल्यानंतर एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गीत ऑस्करवरही दावेदारी करण्यास सज्ज झालं आहे.

Oscar Nominations 2023 : ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्करमध्ये अधिकृत एंट्री; बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत मिळाले नामांकन

Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
Umpire Richard Kettleborough on Sanju Samson and Team India
T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

सिनेजगतातील या परमोच्च पुरस्कारासाठी लघुयादीत ‘नाटू नाटू’ गाण्याने स्थान मिळविले असून भारतीय माहितीपट ‘द एलिफंट विस्परर’ आणि ‘ऑल दॅट ब्रिद’ यांनादेखील नामांकन मिळाले आहे. रिहाना, लेडी गागा, सोफिया कार्सन या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गायकांच्या गाण्यांशी एम. एम. कीरावानी यांनी संगीत दिलेल्या आणि कालभैरव-राहुल सिप्लिगुंज लिखित ‘नाटू नाटू’ची स्पर्धा आहे.

Oscar Nomintaions 2023 : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्कर नामांकन

दरम्यान,फक्त ‘छेल्लो शो’च नाही, तर ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ चित्रपटही ऑस्करच्या नामांकन यादीत स्थान मिळवू शकले नाहीत. त्यामुळे हे सर्व चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. भारताची अधिकृत एंट्री ‘छेल्लो शो’ला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये निवडण्यात आलं होतं, परंतु अंतिम नामांकनांमध्ये तो ‘अर्जेंटिना १९८५’ चित्रपटाकडून पराभूत झाला आणि यादीतून बाहेर झाला.