मुंबई-पुणे-मुंबई २

लग्न या विषयावर कोणीही, कितीही आणि केव्हाही काहीही बोलण्यासाठी आपल्याकडे सारेच तज्ज्ञ असतात. चित्रपटांमध्येदेखील हा विषय अनंतवेळा चावून चोथा झालेला आहे. त्यातच हिंदीतला लग्नसोहळ्याचा हिट फॉम्र्युलादेखील आता कालबाह्य झाला आहे. असे असताना लग्नाची गोष्ट सांगायचं जरा कठीणच म्हणायला हवं. त्यातच आजच्या पिढीच्या लग्नाच्या बदलत्या संकल्पना आणि त्याला असणारा प्रॅक्टिकल टचदेखील महत्त्वाचा. पण हे प्रॅक्टिकल असलं तर त्यातल्या भावभावनादेखील जपल्या पाहिजेत. त्या नात्याची एक हळूवार वीण उलगडताना लग्नाच्या कथेची व्यथादेखील होऊन उपयोग नाही. आणि त्यातली गोष्ट हरवता कामा नये. मुंबई पुणे मुंबई २ पाहताना नेमकं हेच जाणवतं. म्हणूनच एकाची लग्नाची प्रॅक्टिकल गोष्ट असं याबाबत म्हणायला हरकत नाही.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

आजच्या पिढीतला मोकळेपणा, बदलत्या संकल्पना, आज अत्यावश्यक गरज असलेली प्रत्येकाची स्पेस आणि त्याच वेळी निर्णय घेण्याच्या पातळीवरचा गोंधळदेखील हे सारं तो व्यवस्थितपणे मांडतो. लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपवर मोकळेपणाने बोललं जातयं. पालकांनी निर्णय घेण्याची दिलेली मोकळीक आणि चुकला तरी (विशेषत: मुलीच्याबाबतीत) सांभाळून घेण्याची प्रवृत्ती. घरचे म्हणतायत त्या मुलाशी लग्न करायचं हा प्रकार आज तुलनेनं कमी झाला आहेच. पण आपणच ज्याला निवडलं त्याच्याशी लग्न करतानादेखील मुलींचं वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होणं प्रकर्षानं मांडलं आहे. लग्नाला हो म्हटलयं पण नेमकं त्याच वेळी मनात एक अनोखं द्वंद्वदेखील मांडलंय. अशा तिढ्यात निर्णय बदलण्याची मोकळीक मिळणं. हे आजच्या बदलाचं थेट प्रतिबिंब म्हणावं लागेल.

चित्रपटातील तीन घटकांना दाद द्याायला हवी. कथेची पकड, अभिनय आणि दिग्दर्शन. मुंबई-पुणे-मुंबई १ चेच कथानक पुढे नेताना मुक्ता आणि स्वप्निलच्या जोडीला त्यांचे कुटुंबिय म्हणून ज्येष्ठ अभिनेत्यांची एक चांगली फौजच यात दिसून येते. बदलत्या पिढीला समजून उमजून घेणारी ही मंडळी आपलं अस्तित्त्व व्यवस्थित दर्शवत आहेत. त्यातच कथा तुम्हाला गुंतवून ठेवते. अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांतून व्यक्त होते. भावनांच्या हिंदोळ्यावर हे सारं कथानक पुढे सरकत असते. पण काही ठिकाणी अतिभावनिकतेकडेदेखील झुकते. (याचा परिणाम निर्णयप्रक्रियेवरदेखील होऊ शकतो, मुख्यत: मुलींच्या बाबतीत) असे प्रसंग टाळून गोष्ट आणखीन आटोपशीर झाली असती. मात्र दिग्दर्शकाने अशाच काही मुद्द्यांचा वापर करून गोष्ट सर्वमान्य करायचा प्रयत्न केला आहे हे निश्चित. उत्तरार्धातील लग्नघरातील चारोळ्यांसारख्या प्रसंगांना कात्री लावली असती तरी हरकत नव्हती. चित्रपटाच्या ओघात कधी कधी पारंपरिक टिपिकलपणा डोकावतो, त्याचा प्रभाव वाढतो हा काहीसा सिनेमॅटिकपणा मात्र कमी व्हायला हवा होता.

एखादी कौटुंबिक गोष्ट सांगताना त्यातून हळूवारपणे भाष्य तर करायचंय पण त्याच वेळी त्या गोष्टीतली रंजकता, नाट्य टिकवून ठेवायचंय, गोष्टीतपण गुंतवून टाकायचं अस काहीसं या चित्रपटाबद्दल म्हणावं लागेल. एका खट्याळ, खेळकर अशा वातावरणातून सुरू झालेल्या मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातली प्रेमाचा प्रवास या सिक्वलमध्ये लग्नाच्या बोहल्यावर पोहचताना अनेक बदल टिपत टिपत पुढे जातो. सामाजिक, वैयक्तिक, व्यावहारिक आणि मानसिक अशा बदलांची एक सुरेख वीण या गोष्टीत बांधली आहे. वर वर पाहिलं तर केवळ एक ठरलेलं लग्न होतानाचा मानसिक गोंधळ किंवा सोहळा असं वाटत असलं तरी जे काही पडद्यावर मांडलंय त्यातून दिग्दर्शकाने अनेक घटकांवर अगदी सहजपणे भाष्य केलं आहे.

चित्रपटात गाण्यांना फार वाव नाही. जी काही गाणी आहेत ती नसती तरी काही फरक पडला नसता. कॅमेºयाने आपली भूमिका चोख बजावली आहे. विशेषत: मुक्ता आणि स्वप्निलचा मरिन ड्राईव्हवरचा रात्रीचा संवाद खूपच प्रभावीपणे आला आहे. बोलका झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या टिपिकल लग्न सोहळ्यासारखा चित्रपट पाहावा लागेल की काय अशी एक शंका होती ती पार धुळीला मिळाली हे एक बरे झाले. त्याच बरोबर उगाच काही तरी प्रथा पडतील (जसं लग्नात नवरदेवाची चप्पल चोरण्याची प्रथा सुरू झाली होती). अशा प्रसंगांचा मोह टाळल्याबद्दल दिग्दर्शकाला धन्यवादच द्यावे लागतील.

एका ठरवलेल्या लग्नाची ही लग्नाआधीची प्रेमकथा जरी असली तरी असं काही खरंच घडतं का, असादेखील प्रश्न अनेकांना पडू शकतो. समाजात जे घडते ते चित्रपटात दिसते किंवा याच्याच अगदी उलट होत असते अशी दोन टोकाची मतं याबाबत मांडली जातात. पण येथे मात्र समाजबदलाचे घटक तुम्हाला टोचणार नाहीत अशा प्रकारे मांडण्यात दिग्दर्शकाचं कौशल्य दिसून येतं. अगदी साधं उदाहरणच द्याायचं तर घरातील सर्वांनी एकत्र बसून पार्टी करायची, त्यात मद्यापान हे आलं. हे हल्ली सुखवस्तू आणि उच्चमध्यमवर्गाकडे वाटचाल करणाºयांच्या घरातलं काहीसं कॉमन चित्र. ते इतक्या सहजपणे पडद्याावर मांडलंय की ते न खटकता तुम्ही स्वीकारता. मुलींचा फॉरवर्डपणा दाखवताना मद्यापानासारख्या विषयाचादेखील बाऊ न करता सहजपणा दाखवला आहे. मूळात त्यावर कसलंही भाष्य वगैरे करण्यात वेळ घालवला नाही. कदाचित हे छोट्या शहरात रुचणार नसेल. मुलींनी स्पष्टपणे स्वत:चं मत मांडत परिस्थितीला सामोरं जाणं त्याच्या बºया वाईटाची जबाबदारी घेणं, त्यासाठी कोणताही धाडसी वाटावा असा निर्णय घेणं अशा अनेक प्रसंगातून आजची बदलाची परिस्थिती दिग्दर्शकाने अधोरेखित केली आहे. त्याचवेळी कौटुंबिक धागादेखील सुटू दिला नाही. त्यामुळेच एका लग्नाची पॅ्रक्टिकल गोष्ट म्हणावी लागेल.

एक मात्र आवर्जून नमूद करावं लागेल की हल्ली मराठी चित्रपटदेखील व्यावहारिकपणा दाखवत चित्रपटातून अनेक उत्पादनांच्या जाहिराती करत आहेत. यात चुकीचे काही नाही. तो त्यांच्या व्यवसायाचा भागच आहे. पण या जाहीरातीदेखील सहजपणे येणं महत्त्वाचं आहे. कथेच्या दिग्दर्शनात जसा जीव ओतला जातो तसाच या प्रसंगांसाठी ओतावा लागेल. अन्यथा हे प्रसंग सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील खटकू शकतात. हे भान येथे सांभाळलं गेलं नाही.

कथासूत्र –
गौरी आणि गौतम यांच्यातला मुंबई-पुणे-मुंबईचा प्रवास लग्नाच्या होकारापर्यत जाऊन ठेपतो. दोन्हीकडचे लोक एकमेकांना भेटतात. साखरपुडा, लग्नाची खरेदी अशी धामधूम सुरु होते. दोन्ही घरांमध्ये आनंद उत्साह ओसंडून वाहत असतो. त्याचवेळी गौरीची माफी मागण्यासाठी म्हणून अर्णव (तिचा जुना प्रियकर) भेटतो. कधीही माफी न मागणारी व्यक्ती माफी मागते याचं तिला आश्चर्य वाटते. त्याचवेळी गौतमशी भेटीगाठीत तिला त्याचा स्वभाव वेगळा वाटू लागतो. लग्नानंतरच्या आयुष्यात तिची स्पेस तिला मिळेल का यातून ती प्रचंड अस्वस्थ होते. त्यातूनच लग्नाचा पुर्नविचार करायचं ठरवते. लग्न ठरल्यापासून लग्नाच्या तारखेपर्यंतच्या या सहा महिन्याचा हा प्रवासात बरीच उलथापालथ होते.

निर्माते: मिराह एन्टरटेनमेंट आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेंट
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
कला दिग्दर्शक: निखील कोवळे
पटकथा-संवाद: अश्विनी शेंडे
संगीत: अविनाश-विश्वजित
छायांकन: सुहास गुजराथी
नृत्यदिग्दर्शन: सुभाष नकाशे
वेशभूषा: पल्लवी राजवाडे
मेक अप: अतुल शिधवे
कलाकार: स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, श्रुती मराठे आणि सुहास जोशी

Story img Loader