चहाच्या किटलीतून कटींगच्या ग्लासात चहा ओतला जातोय. विमनस्क वाटणारी, पण तरीदेखील स्वत:ची ग्रेस असणारी व्यक्ती टपरीवरच्या प्रत्येकाच्या टेबलावर एक एक ग्लास ठेवतेय. स्वत:शीच बोलत. जणूकाही स्वत:च आयुष्यच मांडत. अर्थातच त्याच्या गाजलेल्या भूमिकांचय संवादातून. एक दोन मिनिटांच्या या प्रसंगातच तुमच्या लक्षात येते की हे केवळ ‘ते’ नाटक नाही. हा चित्रपट आहे. गोष्ट सांगण्याची पद्धत, मांडणी, भाषा, विस्तार वेगळं आहे. मूळ कथानकाच्या पहिल्या फ्रेममधूनच हा चित्रपट तुम्हाला बाहेर काढतो. स्वत:च्या वेगळ्या फ्रेम तयार करतो.

नाटकात असे होते आणि यांनी असं दाखवलय अशी तुलना करण्यात येथे वेळ घालवण्याची काहीच गरज नाही. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे. पण चित्रपटाच्या प्रदीर्घ लांबीमुळे संवादावरील लक्ष विचलित होण्याचा संभव आहे. काही प्रसंगातील मूलभूत उणीवा सोडल्या तर एक चित्रपट म्हणून मांडणी चांगलीच जमली आहे असे म्हणता येईल.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

मूळात चित्रपटाची म्हणून जी एक भाषा असते त्याची जाण आणि भान संपूर्ण चमूला असावी लागते, ती येथे पुरेपूर आहे. त्याचबरोबर मूळ कलाकृतीचीदेखील जाण आहे. चित्रपट रुपांतर, पटकथा लेखन, संवाद या तीनही पातळीवर अनेक चांगले बदल दिसून येतात. त्यापैकी एक बदलाची दखल खासकरुन घ्यावी लागेल. ती म्हणजे नटसम्राटाचा समकालीन मित्र. हा त्याचं थेट मूल्यमापन तर करतोच पण त्याचबरोबर तो तुम्हाला एकंदरच प्रसंगांची जाणीव करुन देतो. या दोघांच्या एकत्रित प्रसंगामध्ये कलाकारांची देहबोली, भाषा, जगण्यातला मनस्वीपणा, काहीसा बेफीकीरपणा, भाबडेपणा, नाटकीपणा हे सारं सारं उलगडण्यास मदत होते. त्यांच्या संवादातून एक सामायिक धागा रेखाटण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झालाय. विक्रम गोखले यांनी या भूमिकेला न्याय दिला आहे. नाटकाशी तुलना करायचीच तर हे पात्र चित्रपटात नसतेच तर काय झाले असते असा प्रश्न नकळत पडतो. रामच्या शेवटच्या प्रसंगात नाट्यमयता जरा जास्तच झाली असली तरी त्यातून अनेक सूचक गोष्टी दिग्दर्शकाने मांडल्या आहेत.

नटसम्राटाची पत्नी हे या कथेतलं नटसम्राटाच्या बरोबरच महत्त्वाचं पात्र. अतिशय कमी संवाद असलेली पण प्रसंगाचे गांभीर्य दाखवणारी अशी ही भूमिका मेधा मांजरेकरांनी समर्थपणे पेलली आहे. मोजकीच पण सूचक वाक्यं आणि काही वेळा एक दोन शब्दांच्या पलिकडे न जाणारी प्रतिक्रिया आणि केवळ देहबोलीतून व्यक्त होणारी ही भूमिका खूप काही सांगून जाते.

चित्रपटीय रुपांतरासाठी जे काही बदल करावे लागले आहेत ते चांगलेच जमले आहेत. विशेषत: जळलेल्या नाटगृहाच्या पाश्र्वभूमीवर नटसम्राटाची कथा फ्लॅशबॅकने उलगडत जाणे ही संकल्पना मस्तच झाली आहे. त्या प्रसंगाना खोली प्राप्त झाली आहे. पण कथाविस्ताराच्या मोहात काही मूलभूत डाचणाºया गोष्टीदेखील दिसून येतात. नटसम्राटाच्या नातीचे शाळेतील स्नेहसंमेलनातील नृत्य आणि मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील दारु पिऊन घातलेला गोंधळ हे दोन्ही प्रसंग खटकतात. स्नेहसंमेलनातील नाच-गाणं हे नातीच्या वयाच्या मानाने जरा अतिच झाले आहे. त्यातून काय सांगायचे हे जरी जाणवत असले आणि ते मान्य होत असले तरी हे व्यक्त करण्यासाठीचे प्रतिक टोकाचे वाटते.

मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाचा प्रसंगदेखील असाच अतिरेकी वाटतो. मूळात तो नटसम्राट आहे. तो काही अट्टल दारुडा नाही, की दिसली दारु की लागला ढोसू. त्याच्या मनस्वीपणात दारु हा अनेक घटकांपैकी एक आहे, सर्वस्व नाही. त्यामुळे या प्रसंगात सिनेमाकत्र्यांची हे भान हरवले आहे की काय असे वाटते.

या चित्रपटात गाणी आलीच नसती तरी काहीदेखील बिघडले नसते. मात्र कथानकातील महत्त्वाच्या घटनांवरच ही चित्रित झाल्यामुळे ती चित्रपटाच्या लांबीवर परिणाम करत नाहीत ही जमेची बाजू म्हणावे लागेल. पण एकूणच चित्रपट बºयापैकी मोठा झाला आहे. (पावणे तीन तास) तो कमी करणे शक्य होते.

लोकेशन, सेट या बाबतीत बरीच मेहनत घेतल्याचे प्रकर्षाने जाणवते. नाटकाच्या मर्यादीत अवकाशातून कथेला बाहेर काढण्यासाठी त्यांची गरज होतीच. नटसम्राटाची व्यथा फ्लॅशबॅक पद्धतीने दाखविण्यासाठी योजलेली जळलेली, उध्वस्त नाट्यगृहाची पाश्र्वभूमी दाद द्याावी अशी आहे. ८०-९० चा काळ दाखवण्यासाठीचे अनेक प्रयत्नदेखील ठळकपणे उठून दिसतात.

नानाची निवड ही सार्थ ठरणारी आहे. पण काही प्रसंगात तो अप्पा बेलवलकर न वाटता नानाच वाटतो. विशेषत: उद्वेगाने जेव्हा तो बोलतो तेव्हा, त्याचे नाना असणे जाणवते. प्रत्येक अभिनेत्याची नटसम्राट साकारण्याची मनोमन इच्छा असते. जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते स्वत:चीच भूमिका जगत असतात. नानाचा एकंदरीत स्वभाव, त्याचं वागण हे सारं या भूमिकेला पूरक ठरले आहे. चित्रपटभर नानाची छाप दिसून येते. इतर पात्रांना तसा फार वाव नाही. मृण्मयी देशपांडेने साकारलेली नटसम्राटाच्या मुलीची भूमिका लक्षात राहते.

एका माहित असलेल्या विषयावर, नाटकावर वेगळा चित्रपट करणे हे आव्हान असते. त्यांचे आणि यांचे असचं त्याकडे पाहीलं जातं. पण काही वेगळे प्रयोग केलेलं माध्यमांतर करताना मूळ कथेची प्रतिष्ठा सांभाळत पुढे जावे लागते आणि स्वत:ची वेगळी छापदेखील सोडावी लागते. नटसम्राटच्याबाबतीत हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असे म्हणता येईल.
—————————–
कथासूत्र –
तीस-चाळीस वर्षे रंगभूमी गाजवलेला एक कलाकार निवृत्त होतो. नटसम्राट अशीच त्याची ख्याती असते. तो शरिराने निवृत्त झाला असला तरी मनाने निवृत्त झालेला नसतो. तो नाटकातच रमलेला असतो. त्याचा त्याच्या आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. त्याचं स्वच्छंदी बेफिकीर जगणं मुलाबाळांना डाचू लागते. जे होतं ते सारं मुलामुलींच्या नावे केलेलं असतं. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट गलितगात्र होतो. त्याच्या आयुष्याची एक असह््य फरफट सुरु होते. पण त्यातदेखील त्याचे नाटक सुटलेले नसते.
——————————
निर्मिती – फिनक्राफ्ट मीडिया, गजानन चित्र, ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट
प्रस्तुतकर्ते – झी स्टु़डीओ
निर्माता – विश्वास जोशी, नाना पाटेकर
दिग्दर्शक – महेश मांजरेकर<br />सह-दिग्दर्शक – सुदेश मांजरेकर
कथा – वि. वा. शिरवाडकर
पटकथा – महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे
संवाद – किरण यज्ञोपवीत, अभिजीत देशपांडे
संगीत – अजित परब
छायांकन – अजित रेड्डी
कला दिग्दर्शन – एकनाथ कदम
रंगभूषा – विक्रम गायकवाड
संकलक – परेश मांजरेकर
कलाकार  – नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, अजित परब, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे, सुनील बर्वे, जयंत वाडकर, निलेश दिवेकर, प्रांजल परब, सविता मालपेकर, सारंग शेट्ये

Story img Loader