दिवंगत कवी अरुण कोलटकर यांची ‘परंपरा’ ही कविता उद्धृत करताना दै. ‘सकाळ’ने प्रकाशकाचे नाव दिले नाही, म्हणून न्यायालयात गेलेला स्वामित्वहक्क-भंगाचा वाद मराठी वृत्तपत्रांनाही मार्गदर्शक ठरणार आहे, अशा अर्थाची बातमी (‘शहाण्यांनी दाखवली स्वामित्वहक्काची सकाळ’, लोकसत्ता, दि. ७ ऑक्टोबर) प्रसिद्ध करताना, कोलटकर यांच्या कवितांचे स्वामित्वहक्क त्यांच्या पत्नीकडे आहेत याचा उल्लेख राहून गेला, याकडे हा दावा लढविणारे अधिवक्ते संजय खेर यांनी लक्ष वेधले आहे.
दिवंगत कवी अरुण कोलटकर यांच्या कवितांचे स्वामित्वहक्क त्यांच्या पत्नी सुनू कोलटकर यांच्याकडे असून, त्याच्या प्रकाशनाचे हक्क ज्येष्ठ समीक्षक अशोक शहाणे यांच्याकडे आहेत. अरुण कोलटकर यांच्या कवितांच्या पुस्तकांचे प्रकाशक म्हणून सुनू कोलटकार यांनी स्वामित्वहक्काच्या दाव्याचे कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) अशोक शहाणे यांच्याकडे दिले होते. संबंधित दैनिकातील लेखात अरुण कोलटकर यांची कविता प्रसिद्ध करताना सुनू कोलटकर यांच्याकडून कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळे सोनू कोलटकर यांनी अशोक शहाणे यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला, आणि न्या. शाहरुख काथावाला यांनी स्वामित्वहक्काचा निकाल सुनू कोलटकर यांच्या बाजूने दिला, अशी माहिती अॅड. संजय खेर यांनी दिली.
स्वामित्वहक्काचा निकाल सुनू कोलटकर यांच्या बाजूने
दिवंगत कवी अरुण कोलटकर यांची ‘परंपरा’ ही कविता उद्धृत करताना दै. ‘सकाळ’ने प्रकाशकाचे नाव दिले नाही, म्हणून न्यायालयात गेलेला स्वामित्वहक्क-भंगाचा वाद मराठी वृत्तपत्रांनाही मार्गदर्शक ठरणार आहे,
First published on: 08-10-2013 at 02:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copyright decisions in favor of sonu kolhatkar over his poem publication