मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) सायबर पोलिसांनी नुकतीच एका ४७ वर्षीय अभिनेत्याला चित्रपट व जाहिरातींमध्ये काम देण्याच्या नावाखाली ८० पेक्षा अधिक लोकांना दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याच्या आरोपात अटक केली आहे.

अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून एमबीए पदवी आणि एका अभिनय संस्थेचे सर्टिफिकीट मिळवलेला अपूर्व अश्विन दोवडा हा बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होता. दरम्यान, या प्रकरणी त्याला १० जून रोजी पुण्यातील आपल्या ठिकाणाहून तो ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर खल्लारपूर टोल नाक्यावर पोहचल्यावर अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोवडाने विविध राज्यांमध्ये आणि परदेशातही अनेकांना लुबाडले आहे. त्याचे दुबईत जेनिया स्टार नावाने एक ऑफिस देखील आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, त्याने कथितरित्या आपली फिल्म ‘ट्रान्स’च्या रिलीजसाठी पैशांची आवश्यकता असल्याने लोकांना लुबाडले. त्याने फिल्मसाठी २५ लाख रुपये खर्च केले होते. दोवडा वर बोरीवली येथील महेश गुप्ता (४७) यांना फसवल्याचाही आरोप आहे.  गुप्ता यांचा विमानाचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय आहे, त्यांनी आपल्या मुलीसाठी आगामी फिल्म बच्चो की दुनिया मध्ये मुख्य भूमिकेसाठी दोवडाला ३३ लाख रुपये दिले होते.

खरंतर तो उच्च पात्रताधारक आहे, मात्र तरी देखील त्याला झटपट पैस मिळवण्याची सवय लागली होती आणि त्याने गुन्हे करणं सुरू केले. तो लुबाडलेल्या पैशांमधून ऐशोआरामाचे जीवन जगत होता. तो दर सहा महिन्याला इंम्पोर्टेड कार बदल होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तो फारतर एक किंवा दोन महिनेच एका अलिशान बंगल्यात भाडेतत्वार राहायचा, जेणेकरून कुणी त्याला शोधू शकणार नाही. तसेच, आम्ही ४० सीम कार्ड, ९ बँक खाते, अनेक पासपोर्ट आणि एक आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससह ९ मोबाईल देखील हस्तगत केले आहेत. अशी माहिती सायबर सेलच्या आयुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिल्ममध्ये माझी मुलीस मुख्य भूमिका देण्यासाठी दोवडाने मला आमिष दाखवल्याने मी जवळपास ३३ लाख रुपये त्याला पाठवले. मात्र त्यांना गुप्तांना तेव्हा संशय आला जेव्हा दोवडाने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली आणि फिल्म शुटींगची कुठलीही चिन्ह दिसली नाही. तर, पोलिसांनी सांगितले की, आरोपीने काही जाहिरात व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी काही वर्षे अगोदर देखील त्याला अटक देखील केली होती व आर्थर रोड जेलमध्ये रवानगी देखील करण्यात आली होती.