नागपूर : दिवाळीच्या तोंडावर नागपूर, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यांत करोनातील ओमायक्राॅन संसर्गातील एक्सबीबी हा उपप्रकार आढळला आहे. अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेच्या (एम्स) जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत हे निदान झाले आहे. हा उपप्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण पसरवत असल्याचा अंदाज आहे.
याबाबत एम्सच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मिना मिश्रा म्हणाल्या, भंडारा जिल्ह्यातून एसबीबी उपप्रकाराचे दोन रुग्ण नोंदवले गेले आहेत. ऑक्टोबरच्या पंधरवड्यात महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या एक्सबीबी उपप्रकारची १८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी १३ पुण्यातील, नागपूर आणि ठाण्यात प्रत्येकी २ आणि अकोल्यातील १ आहे. सध्या ओमायक्राॅनचे ३०० हून अधिक उपप्रकार जगभरात आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञडॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी काही देशात पुन्हा करोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, भारतातही एक्सबीबी हा सगळ्याच जास्त संक्रमण पसरवणारा ओमायक्राॅनचा उपप्रकार आढळल्याने चिंता वाढली आहे.
हेही वाचा : बिबट्यांच्या लढाईत वाघाची “एन्ट्री” अन्……
दिवाळीत शासकीय नियम पाळा
“करोनावर नियंत्रण शक्य असून लक्षणे दिसताच संबंधित रुग्णांची चाचणी व त्याचे विलगीकरण महत्वाचे आहे. परंतु प्रक्येकाने दिवाळीतही ही काळजी घेण्याची गरज आहे”- डॉ. विभा दत्ता, संचालिका, एम्स.