फुलांना सुगंध येतो म्हणून त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. असाच सुगंध आपल्या शरीरालाही यावा असं माणसाला वाटणं साहजिकच आहे. तसं गुलाबपाणी िशपडून सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न प्राचीन काळी होत असे.
अत्तरं आणि परफ्यूम्सच्या दुनियेत पॅरिसचा फ्रॅन्कॉईस कोटी हा पहिला श्रेष्ठ निर्माता समजला जातो. याने पॅरिसमध्येच सर्वप्रथम परफ्यूम बाजारात आणला आणि एकापेक्षा एक सरस परफ्यूम्सनी या जगात गंध भरणारा त्याचा कारखाना आजही चालू आहे. सध्या परफ्यूम्स म्हणून जी रसायनं आपण वापरतो त्यांमध्ये इसेन्स किंवा इसेन्शियल तेलं असतात. त्यांना आपण आपल्या सोयीसाठी सुवासिक द्रव्यतेलं म्हणू या.
हवेच्या संपर्कात या द्रव्यतेलाचे बाष्पीभवन म्हणजेच वाफ होते आणि त्यातले सुवासिक कण आसमंतात विखुरतात. ही द्रव्यतेलं पानं किंवा फुलांपासून मिळवतात. बऱ्याचदा परफ्यूम्स किंवा सुगंधी द्रव्य तयार करताना एकापेक्षा जास्त सुगंधी द्रव्यतेलं वापरतात. सुगंधीद्रव्य तेलांचे साधारणपणे तीन गट केले आहेत. पहिल्या गटामध्ये हलका परिणाम देणारी म्हणजे ज्यांचा वास लवकर नष्ट होतो, अशी स्रिटोनेलासारखी द्रव्यतेलं! गुलाबासारखी जरा जास्त तीव्र सुगंध देणारी आणि जास्त काळ परिणाम देणारी द्रव्यतेलं दुसऱ्या गटात मोडतात. तिसऱ्या गटातली सुगंधी द्रव्यतेलं ही वनस्पतीपासूनच मिळणाऱ्या जरा जाडसर आणि िडकासारख्या पदार्थापासून मिळतात.
िडक किंवा चिकासारखे हे पदार्थ वाळवून त्यात थोडी कोळशाची पूड मिसळून त्याच्या उदबत्त्या किंवा धूपस्टिक्स बनवल्या जातात. नसíगक सुगंधी द्रव्यांची रासायनिक रचना समजल्यामुळे आता अनेक सुगंधी द्रव्यं कृत्रिमरीत्या तयार करता येतात. उदाहरणार्थ, जिरॅनिऑल, स्रिटोनेलॉल, फिनाईल इथाईल अल्कोहोल, लिनॅलूल, ही चार रसायनं एका ठरावीक प्रमाणात मिसळली की हुबेहूब गुलाबाचा गंध देणारं परफ्युम तयार होतं. कृत्रिम परफ्यूम तयार करताना त्यात जवळजवळ ७८ ते ९५ टक्के ठरावीक अभिक्रिया केलेलं इथाईल अल्कोहोल आणि उरलेला भाग सुगंधी द्रव्यतेलं असं प्रमाण असतं. सध्याच्या काळात फळांचे वास असलेले परफ्यूम्स किंवा त्याही पुढे जाऊन मसाल्याच्या पदार्थाचा गंध लाभलेले परफ्यूम्स, साबण, शाम्पूही वापरले जाताहेत.
प्रबोधन पर्व: ‘मराठी भाषा – स्थिती आणि भविष्य’
‘‘ज्ञानाच्या क्षेत्रात आज मराठी भाषा सार्वभौम नाही. म्हणजे असे की, आज ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत त्यांतील एखाद्या ज्ञानशाखेत अर्थपूर्ण भर टाकणारे संशोधन एखाद्या मराठी भाषिकाने केले तर हे मराठी भाषेतून केलेले संशोधन असणार नाही, ते मराठीत प्रसिद्ध होणार नाही आणि तसे ते प्रसिद्ध झाले तरी त्याचे समीक्षण करून त्याच्या गुणवत्तेची इयत्ता ठरवू शकतील असे मराठी तज्ज्ञ पुरेशा संख्येने उपलब्ध असणार नाहीत. एखाद्या मराठी संशोधकाने मराठी भाषेच्या प्रेमाखातर ते मराठीतून प्रसिद्ध करण्याचे ठरविले तर तो विक्षिप्तपणाचा प्रकार मानला जाईल. तो केवळ एक उपचार असेल आणि त्याचे भाषांतर जेव्हा इंग्रजी भाषेत (किंवा तत्सम भाषेत) प्रसिद्ध होईल तेव्हा ते खरोखर प्रसिद्ध झाले असे मानण्यात येईल. ह्य़ा अर्थाने फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी इ. भाषा सार्वभौम आहेत आणि इंग्रजी भाषा ह्य़ा बहुभाषिक समाजाची संपर्कभाषा आहे असे म्हणता येईल. मराठी आणि भारतीय विद्वान ह्य़ा समाजात इंग्रजी भाषिक म्हणून सहभागी आहेत. ही वस्तुस्थिती आहे.’’
मे. पुं. रेगे ‘मराठी भाषा – स्थिती आणि भविष्य’ (नवभारत, एप्रिल-मे १९९६) या लेखात लिहितात – ‘‘..लोकसंख्येची नैसर्गिक भाषा ज्ञानाच्या क्षेत्रात सार्वभौम नाही ह्य़ाचा अर्थ असा की ह्य़ातील बहुसंख्य लोक महत्त्वाच्या ज्ञानापासून वंचित आहेत. ही मान्य होण्यासारखी परिस्थिती नाही. तिच्यात सुधारणा करण्यासाठी काय करता येईल हा खरा प्रश्न आहे. कार्यक्रम सुचविणे कठीण नाही. तो अमलात आणण्यासाठी जी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती आवश्यक आहे ती अंगी बाणवून घेणे कठीण आहे.. आधुनिक ज्ञान आणि त्यावर आधारलेले व्यवहार याच्या संदर्भात मराठी भाषिक समाजाची पायापासून बांधणी करावी लागेल. नाहीतर आहे ही परिस्थिती चालू राहील. म्हणजे ज्ञानात भर घालू शकणारे मूठभर मराठी भाषिक पाश्चात्त्य इंग्रजी भाषिक समाजाचे घटक म्हणून भारतात आणि अन्यत्र राहतील. दुसऱ्या टोकाला बहुसंख्य मराठी माणसे विमोचक ज्ञानापासून वंचित राहून असहायपणे जगत राहतील.’’
मनमोराचा पिसारा: तू माझा सांगाती..
‘माइण्डफुलनेस’ हा शब्द मानसशास्त्रज्ञांनी ‘विपश्यना’ या अर्थाने वापरण्यास सुरुवात करून दीड-दोन दशकं झाली. विपश्यनेच्या भूमीत म्हणजे भारतामध्ये मात्र ‘माइण्डफुलनेस’ ही संकल्पना फारशी सर्वपरिचित नाही.
‘विपश्यना’ ही बुद्धप्रणीत ध्यानाची प्रक्रिया सत्यनारायण गोएंका गुरुजींनी भारतात अनेक ठिकाणी राबवली. किरण बेदी यांनी तिहार जेलमध्ये कैद्यांना विपश्यना शिकवली आणि सरकारदरबारी या प्रक्रियेला राजमान्यता मिळाली. उत्तर अमेरिकेमध्ये ध्यानधारणा-बुद्धप्रणीत झेनमार्ग यावर १९०० सालापासून कुतूहल निर्माण झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर तणावग्रस्त अमेरिकेत महर्षी महेश योगी यांनी ट्रान्सडेंटल मेडिटेशन शिकवायला सुरुवात केली.
७० च्या दशकात शवासन आणि ध्यानधारणेनं अतिरक्तदाब, हृदयविकार, मानसिक औदासीन्य यावर पूरक आणि प्रभावी उपयोग होऊ शकतो, असा ठाम दावा करणारे शोधनिबंध प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. तरीही, ध्यानधारणा म्हणजे खास आध्यात्मिक, धार्मिक, भोळाभाबडा, हिंदू धर्माची छुपी शिकवण देणारा प्रकार आहे, असं समजणारे विद्वान होते. ध्यानधारणा, श्वासावर लक्ष केंद्रित करून ऊर्जा जागृती हे खोटं विज्ञान असून, रॅशनल विचार करणाऱ्या (डाव्या/साम्यवादी) लोकांचा चेष्टेचा विषय होता.
परदेशातील विशेषत: अभियांत्रिकी आणि संगणकीय कॉलेजे, विद्यापीठांत मात्र विपश्यनेबद्दल जिज्ञासा वाटू लागलेली होती. विशेषत: विषयवासना, अमली पदार्थाच्या सेवनाचा अतिरेक करणाऱ्यांसाठीच नव्हे, तर जीवनातल्या हरघडी बोचणाऱ्या तणावासाठी ध्यानधारणेचा उपयोग होऊ शकतो यावर वैद्यकीय संस्थांपेक्षा आणि एमआयटी, हार्वर्ड अशा वैज्ञानिक विद्यापीठांत अधिक संशोधन सुरू झालं. कोणत्याही प्रकारचा (होकारात्मक/नकारात्मक) पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनानं त्यांनी ध्यानधारणेतून निपजलेल्या माइण्डफुलनेस या बुद्धप्रणीत प्रक्रियेचा हर्षभराने स्वीकार केला.
१९७९ साली जॉन कबाट झिन यांनीे प्रथम ‘माइण्डफुलनेस’ प्रक्रियेवर अभ्यास आणि संशोधन केलं. वैज्ञानिक संशोधनामधील काटेकोर अचूकता, गुणवत्ता आणि संख्याशास्त्रीय रिसर्च करून २००० नंतर ‘माइण्डफुलनेस’वर बोलायला सुरुवात केली.
जॉन कबाट झिन यांच्या मते मुळात बुद्धप्रणीत विचारात तथाकथित धार्मिक विचारांचा अंशदेखील नाही. परंतु, पारंपरिक विपश्यना शिकण्याकरिता निदान दहा दिवस मौनव्रतात केलेल्या ध्यानाचा अवलंब करावा लागतो.
प्रा. झिन यांनी विपश्यनेतील मूळ गाभा तसाच ठेवून त्याला व्यावहारिक स्वरूप दिलं. माइण्डफुल म्हणजे मनाची जागृतावस्था. मन क्षणोक्षणी चंचल असतं. मागील अथवा पुढील क्षणातल्या घटनांचा विचार करतं, त्यामुळे ते या क्षणी, या श्वासात हजर नसतं. या क्षणी उपस्थित नसतं.
माइण्डफुल म्हणजे त्या क्षणाचा पूर्ण अनुभव. क्षणाक्षणाला जोडलेल्या काळाची सातत्यानं एकाग्र असलेली जाणीव. म्हणजेच ‘अवेअरनेस’.
प्रा. झिन त्या क्षणाचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी अगदी साधे साधे प्रयोग करतात. उदा. एखादा बेदाणा खाण्याची पूर्ण जाणीव होऊ देणं. इथपासून सुरुवात करून क्षणाची परिपूर्ण जाणीव व्यवसायात कार्यरत असताना कशी टिकवायची? दु:खातही कशी हरवू द्यायची नाही, यावरही ते भाष्य करतात. ‘वेदनेवर लक्ष एकाग्रतेच्या प्रयोगांनी दुर्धर वेदनामयग्रस्त मंडळींवरील त्याचे प्रयोग सर्वात यशस्वी ठरले. त्यांनी ‘पेनलॅब’ही सुरू केली.
त्यांच्या मूळ संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. ‘व्हेअर एव्हर यू गो, देअर यू आर’ या पुस्तकाचं शीर्षक आकर्षक नि समर्पक आहे. ‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती’ असं तुकोबारायांनी विठ्ठलाला म्हटलं, याच मानसिक एकाग्रतेविषयी प्रा. झिन बोलतात.
पुस्तक सुलभ आणि सोपं वाटतं तितकं पचवणं कठीण आहे. परंतु अजिबात चुकवू नये. ब्रह्मानंदी टाळी लागणं, उत्कृष्ट कलाकृतीच्या अनुभवानं गहिवरून येणं हे माइण्डफुलनेसचे अनुभव आहेत..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com